सिद्धार्थ- जान्हवीचा 'परम सुंदरी' ओटीटीवर झाला प्रदर्शित, कुठे पाहता येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 16:59 IST2025-10-10T16:55:52+5:302025-10-10T16:59:45+5:30

सिद्धार्थ मल्होत्रा व जान्हवी कपूर यांचा 'परम सुंदरी' सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.

Sidharth Malhotra Janhvi Kapoor Film Param Sundari OTT Release Now Available On Amazon Prime Video | सिद्धार्थ- जान्हवीचा 'परम सुंदरी' ओटीटीवर झाला प्रदर्शित, कुठे पाहता येणार?

सिद्धार्थ- जान्हवीचा 'परम सुंदरी' ओटीटीवर झाला प्रदर्शित, कुठे पाहता येणार?

Param Sundari OTT Release : OTT प्लॅटफॉर्मवर या आठवड्यात काय पाहावं, असा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. ऑक्टोबर महिन्यात अनेक उत्तम चित्रपट आणि वेब सिरीज डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत, त्यापैकीच एक म्हणजे 'परम सुंदरी' हा चित्रपट. ॲक्शन, कॉमेडी आणि रोमान्सचा उत्तम मेळ असलेला हा चित्रपट आता ओटीटीवर प्रेक्षकांसाठी उपलब्ध झाला आहे. बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला थिएटरमध्ये प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली होती. आता हा चित्रपट तुम्ही घरबसल्या पाहू शकता. 

 'परम सुंदरी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता.  विशेषत: चित्रपटाच्या गाण्यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली होती. ज्यांनी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नाही, त्यांच्यासाठी आता वीकेंडला घरबसल्या मनोरंजनाची ही एक उत्तम संधी आहे.  'परम सुंदरी' आता ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओवर उपलब्ध झाला आहे. पण, यात एक ट्विस्ट आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना पैसे मोजावे लागणार आहेत. 

सध्या हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर भाड्याने (Rent) उपलब्ध आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना तब्बल ३४९ इतकी मोठी किंमत मोजावी लागत आहे, जी एका थिएटर तिकिटाच्या दरापेक्षा निश्चितच जास्त आहे. त्यामुळे अनेक प्रेक्षकांनी इतकी किंमत देऊन चित्रपट पाहण्याऐवजी मोफत स्ट्रीमिंगची प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे. 

प्रेक्षकांसाठी दिलासा देणारी बातमी म्हणजे, 'परम सुंदरी' हा चित्रपट लवकरच प्राइम व्हिडीओ सबस्क्राइबर्ससाठी मोफत उपलब्ध होणार आहे. २४ ऑक्टोबरपासून प्राइम व्हिडीओचे सदस्य कोणत्याही शुल्काशिवाय घरबसल्या या चित्रपटाचा आनंद घेऊ शकतील.

Web Title : सिद्धार्थ-जान्हवी की 'परम सुंदरी' ओटीटी पर रिलीज़; कहाँ देखें?

Web Summary : सिद्धार्थ मल्होत्रा ​​और जान्हवी कपूर की हिट फिल्म 'परम सुंदरी' अब प्राइम वीडियो पर किराए पर उपलब्ध है। यह 24 अक्टूबर से सब्सक्राइबर्स के लिए मुफ्त होगी। फिलहाल, फिल्म किराए पर लेने की कीमत ₹349 है।

Web Title : Sidharth-Janhvi's 'Param Sundari' released on OTT; Where to watch?

Web Summary : Sidharth Malhotra and Janhvi Kapoor's 'Param Sundari', a hit film, is now available on Prime Video for rent. It will be free for subscribers from October 24th. Currently, renting the film costs ₹349.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.