सिद्धार्थ मल्होत्राचा ‘पत्ता कट’! ‘आशिकी3’मध्ये आलिया भट्टसोबत वरूण धवनची वर्णी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2018 15:54 IST2018-04-01T10:24:21+5:302018-04-01T15:54:21+5:30
‘आशिकी’ आणि ‘आशिकी2’हे दोन बॉलिवूडचे सर्वाधिक रोमॅन्टिक चित्रपट कोण कसे बरे विसरू शकेल? आता या सुपरडुपर हिट फ्रेन्चाइजीचा तिसरा ...
.jpg)
सिद्धार्थ मल्होत्राचा ‘पत्ता कट’! ‘आशिकी3’मध्ये आलिया भट्टसोबत वरूण धवनची वर्णी!!
‘ शिकी’ आणि ‘आशिकी2’हे दोन बॉलिवूडचे सर्वाधिक रोमॅन्टिक चित्रपट कोण कसे बरे विसरू शकेल? आता या सुपरडुपर हिट फ्रेन्चाइजीचा तिसरा पार्ट म्हणजे ‘आशिकी3’बनवण्याची तयारी सुरु झाली आहे. खरे तर ‘आशिकी3’च्या चर्चा नव्या नाहीत. बºयाच दिवसांपासून या चित्रपटाच्या चर्चा सुरु आहेत. या चित्रपटात आलिया भट्ट आणि तिचा कथित बॉयफ्रेन्ड (?) सिद्धार्थ मल्होत्राची जोडी दिसणार, अशी मध्यंतरी चर्चा होती. पण ताजी बातमी जराशी धक्कादायक आहे. होय, या चित्रपटासाठी आलिया - सिद्धार्थला नाही तर आलिया व वरूण धवनला साईन करण्यात आल्याचे कळतेय. सूत्रांचे मानाल तर आलिया व वरूण या दोघांची फॅन फॉलोर्इंग बघून मेकर्सनी हा निर्णय घेतला आहे. आलिया व वरूणच्या आॅनस्क्रीन केमिस्ट्रीने चाहत्यांना वेड लावले. इतके की, आलिया व वरूणला लोक ‘वारिया’ आणि ‘वालिसा’ नावाने ओळखू लागले आहेत. ‘स्टुडंट आॅफ द ईअर’,‘हम्टी शर्मा की दुल्हनियां’,‘बद्रीनाथ की दुल्हनियां’ अशा चित्रपटात ही जोडी दिसली आहे आणि प्रत्येकवेळी ती सुपरहिट ठरली आहे. त्यामुळे ‘आशिकी3’साठी या जोडीला साईन करण्यात आले आहे. खरे सांगायचे तर, मेकर्सचा निर्णय योग्यचं म्हणायला हवा. तसेही आलिया व सिद्धार्थमध्ये आता पूर्वीसारखे काहीही राहिलेले नाही. दोघांच्या ब्रेकअपच्या बातम्याही आता जुन्या झाल्या आहेत. त्यातचं सिद्धार्थच्या करिअरची गाडीही जेमतेम पुढे जातेय. म्हणजे, त्याचे एका पाठोपाठ एक आलेले सगळे सिनेमे आपटलेत. याऊलट आलिया व वरूण दोघेही बॉलिवूड इंडस्ट्रीतील खणखणते नाणे आहेत. दोघेही हिट वर हिट देत सुटले आहेत. त्यामुळे ‘आशिकी3’मध्ये त्यांची वर्णी लागली तर त्यात नवल वाटायला नकोय.
ALSO READ : वरूण धवनला मनातल्या मनात छळतेयं ‘ही’ एकचं गोष्ट!!
तूर्तास आलिया ‘गल्ली बॉय’ आणि ‘ब्रह्मास्त्र’मध्ये बिझी आहे. तिचा ‘राजी’ हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. वरूणचे म्हणाल तर तो ‘सुई धागा’ या चित्रपटात बिझी आहे. लवकरच त्याचा ‘अक्टूबर’ प्रदर्शित होतोय.
ALSO READ : वरूण धवनला मनातल्या मनात छळतेयं ‘ही’ एकचं गोष्ट!!
तूर्तास आलिया ‘गल्ली बॉय’ आणि ‘ब्रह्मास्त्र’मध्ये बिझी आहे. तिचा ‘राजी’ हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. वरूणचे म्हणाल तर तो ‘सुई धागा’ या चित्रपटात बिझी आहे. लवकरच त्याचा ‘अक्टूबर’ प्रदर्शित होतोय.