सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्टचे झाले ब्रेकअप ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 17:15 IST2017-08-22T11:45:35+5:302017-08-22T17:15:35+5:30

बॉलिवूडमधल्या सगळ्यात हॉट आणि क्यूट कपलपैकी एक मानले जाणाऱ्या आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या नात्याला कोणाची तरी नजर लागली ...

Siddharth Malhotra and Alia Bhatt got a breakup? | सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्टचे झाले ब्रेकअप ?

सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्टचे झाले ब्रेकअप ?

लिवूडमधल्या सगळ्यात हॉट आणि क्यूट कपलपैकी एक मानले जाणाऱ्या आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या नात्याला कोणाची तरी नजर लागली आहे. मीडिया रिपोर्टनुसार  आलिया आणि सिद्धार्थचे नातं संपुष्टात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या ब्रेकअपची चर्चा रंगली होती. मात्र सिद्धार्थने स्वत:चे या गोष्टीला दुजोरा दिला आहे. नुकताच सिद्धार्थ नेहा शर्माच्या 'नो फिल्टर नेहा' या शोमध्ये आला होता. यावेळी नेहाने त्याला त्याच्या रिलेशनशिप स्टेट्सविषयी प्रश्न विचारला, यावर सिद्धार्थ म्हणाला,''आय एम वेरी मच सिंगल''. ज्यानंतर हे स्पष्ट झाले की सिद्धार्थ आणि आलियाचे रस्ते आता जवळपास वेगळे झाले आहेत.  

ALSO READ : बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्रासोबत काम करण्यास उत्सुक नाही आलिया भट्ट? 

या दोघांमध्ये वादाची ठिणगी एक अभिनेत्रीमुळे पडल्याचे समजते आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून जॅकलिन फर्नांडिस आहे. 'अ जेंटलमॅन' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सिद्धार्थ आणि जॅकलिन एकमेंकाच्या जवळ आले. 'अ जेंटलमॅन'मध्ये सिद्धार्थ आणि जॅकलिन एकत्र दिसणार आहेत. याचित्रपटात दोघांचे बरेच रोमाँटिक सीन्स आहेत. चित्रपटातील रिल लाईफ दरम्यानचा रोमांस सिद्धार्थ आणि जॅकलिन रिअल लाईफमध्ये देखील करायला लागले आहेत आणि याचा थेट परिणाम सिद्धार्थ आणि आलियाच्या नात्यावर झाला. आलियाने सिद्धार्थला अनेक वेळा जॅकलिनपासून दूर राहण्यास सांगितले होते. मात्र सिद्धार्थने याकडे फारसे लक्ष न देता  याउलट त्यांने आलियाला तिच्या आणि वरुण धवनच्या नात्याची आठवण करुन दिली. ज्यानतंर दोघांच्या नात्यात कटुता आल्याचे समजते आहे. सिद्धार्थ आणि आलियाने आपल्या करिअरची सुरुवात स्टुंडट ऑफ द इअर चित्रपटातून केली होती. अनेक पार्ट्यांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी दोघांना एकत्र फिरताना पाहण्यात आले होते. मात्र आता बॉलिवूडमधले हे लव्हबर्डस वेगळे झाले आहेत.   

Web Title: Siddharth Malhotra and Alia Bhatt got a breakup?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.