​सिद्धार्थ मल्होत्रा व आलिया भट्टचे झाले जोरदार भांडण; ‘ही’ हिरोईन ठरली कारणीभूत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2017 12:19 IST2017-06-01T06:49:28+5:302017-06-01T12:19:28+5:30

आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची जवळीक आता कुणापासूनही लपून राहिलेली नाही. ‘स्टुडंट आॅफ दी ईअर’मधून सिद्धार्थ व आलियाने ...

Siddharth Malhotra and Alia Bhatt get tough fight; 'This' heroine is the reason! | ​सिद्धार्थ मल्होत्रा व आलिया भट्टचे झाले जोरदार भांडण; ‘ही’ हिरोईन ठरली कारणीभूत!

​सिद्धार्थ मल्होत्रा व आलिया भट्टचे झाले जोरदार भांडण; ‘ही’ हिरोईन ठरली कारणीभूत!

िया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची जवळीक आता कुणापासूनही लपून राहिलेली नाही. ‘स्टुडंट आॅफ दी ईअर’मधून सिद्धार्थ व आलियाने एकत्र बॉलिवूड डेब्यू केला आणि तेव्हापासून जणू ख-या आयुष्यातही एकत्र आलेत. दोघेही एकमेकांना डेट करत असून या नात्याबद्दल सीरिअस आहेत, असेही कळते. पण सध्याचे म्हणाल तर दोघांच्याही नात्यात फारकाही आॅलवेल नाहीय. ‘ट्रबल इन पॅरॉडाईज’ म्हणतात ना तसलेच काही. आता याचे कारण, विचारांतील मतभेद वगैरे असतील, असे तुम्हाला वाटत असेल तर असे नाहीच मुळी. मुळात या वादाला कारणीभूत ठरली तर ती जॅकलिन फर्नांडिस. होय, जॅकलिनसोबत सिद्धार्थची वाढती जवळीक आलियाला खटकली आणि मग ती सिद्धार्थवर बरसली, अशी हॉट बातमी आहे.



ALSO READ : Opps​ : अन् त्याने आलिया भट्टला समजले श्रद्धा कपूर!!

जॅकलिन व सिद्धार्थ लवकरच ‘रिलोडेड’ या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाच्या सेटवर दोघेही अतिच फ्रेन्डली झालेत. यानंतर एकत्र कॉफी, ड्रिंक्स, आऊटींग असे सगळे सुरु झाले. हे प्रमाण इतके वाढले की,‘कॉफी विद करण’च्या सीझन 5 मध्ये करण जोहरने सुद्धा सिद्धार्थ व जॅकलिनला त्यांच्या वाढत्या मैत्रीबद्दल प्रश्न विचारला होता. ही गोष्ट सिद्धार्थच्या कथित गर्लफ्रेन्डच्या म्हणजेच आलियाच्या कानावर गेली नसेल तर नवल.  मग काय, आलिया  या बातमीने चांगलीच बिथरली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुद्यावरून आलिया व सिद्धार्थ या दोघांमध्ये अलीकडे जोरदार भांडण झाले. हे भांडण चांगलेच विकोपाला गेले. दोघांनीही काही महिन्यांपूर्वी हॉली डे प्लान केला, ते या भांडणातून मार्ग काढण्यासाठीच.  आलिया व सिद्धार्थमधील हा वाद आता निवळला असेल, अशी अपेक्षा करू यात.

Web Title: Siddharth Malhotra and Alia Bhatt get tough fight; 'This' heroine is the reason!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.