बॉलिवूडमध्ये टिकायचं असेल तर, सिद्धांत चतुर्वेदीने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 02:16 PM2021-11-11T14:16:02+5:302021-11-11T14:36:24+5:30

गेल्या कित्येक वर्षापासून बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवरून वाद सुरु आहे. पण नेपोटीझम हे बॉलिवूडमध्येच नाही तर प्रत्येक क्षेत्रात आहे.

Siddhant Chaturvedi open up regarding bollywood, says this needs to be done if you need to stay | बॉलिवूडमध्ये टिकायचं असेल तर, सिद्धांत चतुर्वेदीने केला खुलासा

बॉलिवूडमध्ये टिकायचं असेल तर, सिद्धांत चतुर्वेदीने केला खुलासा

googlenewsNext

आपल्या अभिनयाने रसिकांसह समीक्षकांचीही मनं जिंकणारा अभिनेता म्हणजे अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी.बॉलिवूडमधल्या आजवरील प्रवासाबाबत त्याने काही गोष्टींचा खुलासा केला आहे. बॉलिवूडमध्ये घराणेशाही मुद्द्यावरही त्याने आपले मतं मांडले. याविषयी तो म्हणाला की,‘बॉलिवूडमध्ये आपली दखल घेतली जावी यासाठी बराच काळ वाट पाहावी लागते. उत्तम अभिनय कौशल्य असूनही दखल घेतली जात नाही. त्यासाठी तुम्हाला प्रचंड संघर्ष करावा लागतो. मोठी संधी मिळण्यापूर्वी मला स्वतःला इथे सिद्ध करावे लागले. त्या काळात मला खूप चांगल्या गोष्टी शिकता आल्या.

करियरच्या सुरुवातीलाच दिलेल्या संधीबद्दल मी झोया अख्तर, फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांचा कायमच ऋणी राहीन. त्यांनी जर मला  संधी दिली नसती तर आज मी इथवर पोहोचलो नसतो. गेल्या कित्येक वर्षापासून बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवरून वाद सुरु आहे. पण नेपोटीझम हे बॉलिवूडमध्येच नाही तर प्रत्येक क्षेत्रात आहे. हे खरंय की, इनसायडर्सना लवकर संधी मिळतात आणि आऊटसाईडर्सना संधी मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागती. पण मेहनतीने जी संधी मिळते त्यातच खरी मजा आहे. माणूस म्हणून आपल्याला घडवण्यात या मेहनतीचा मोठा वाटा आहे असेही सिद्धांत म्हणाला.

 
स्ट्रगल कुणालाही चुकलेला नाही. प्रत्येकालाच आपल्या करिअरच्या सुरुवातीला स्ट्रगल हा करावाच लागतो. स्ट्रगलला केवळ स्ट्रगल समजून रडत बसलात तर काही खरं नाही. मी स्ट्रगलचा आनंद घेतला. प्रत्येक वळणावर स्ट्रगलचा बाऊ न करता त्याचा आनंद लुटा. स्ट्रगलच्या कालावधीत प्रत्येक गोष्टीमधून काही ना काही शिका आणि त्यातून तुम्ही स्वतःमध्ये काही ना काही बदल करून घ्या.

सातत्याने प्रयत्न करत राहा, हताश होऊ नका आणि यशापासून तुम्हाला कुणीही अडवू शकत नाही. कारण मी स्वतः इंडस्ट्रीत आलो तेव्हा  काम मिळेल की नाही, कुठे राहायचं असे अनेक प्रश्न माझ्यापुढे होते. मात्र कठीण काळात अनेकांनी साथ दिली. त्यांनी सुरूवातीला दिलेल्या प्रोत्साहन आणि मदतीमुळे स्ट्रगलचा आनंद घेत इथवर मजल मारली आहे. सिद्धांत चतुर्वेंदी यश राज फिल्म्सचा 'बंटी और बबली 2' या सिनेमात झळकणार आहे. हा  सिनेमा 19 नोव्हेंबरला रसिकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: Siddhant Chaturvedi open up regarding bollywood, says this needs to be done if you need to stay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.