श्वेता आणि मी एकमेकांसाठी बनलोच नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 08:26 IST2016-02-09T02:56:47+5:302016-02-09T08:26:47+5:30

अभिनेत्री यामी गौतमसोबत मैत्रीची चर्चा चांगलीच रंगत असताना अभिनेता पुलकित सम्राटने अखेर मौन सोडले आहे. पत्नी श्वेता रोहिरा आणि ...

Shweta and I did not create for each other | श्वेता आणि मी एकमेकांसाठी बनलोच नाहीत

श्वेता आणि मी एकमेकांसाठी बनलोच नाहीत

िनेत्री यामी गौतमसोबत मैत्रीची चर्चा चांगलीच रंगत असताना अभिनेता पुलकित सम्राटने अखेर मौन सोडले आहे. पत्नी श्वेता रोहिरा आणि मी एकमेकांसाठी बनलेलो नव्हतो. त्यामुळे आमचे संबंध टिकू शकले नाहीत, असे वक्तव्य त्याने नुकतेच केले आहे. पुलकित हा सध्या ३२ वर्षांचा आहे. सुपरस्टार सलमानखानची मानलेली बहीण श्वेतासोबत २०१४मध्ये त्याने विवाह केला होता. मागील वर्षी त्यांच्यात काही तरी बिनसले आणि ते दोघे वेगळे झाले. दुसरीकडे ‘सनम रे’ मधील त्याची सहकारी यामीसोबत त्याची मैत्री वाढत आहे. श्वेता आणि माझ्यात पटले नसेल तर त्याला ती आणि मी दोघेही तेवढेच जबाबदार आहोत. संबंध बिनसण्यामागे कुणी तिसरी व्यक्ती आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. यामीवर या बाबतीत आरोप करणे म्हणजे तिला यशापासून मागे ओढण्याचा प्रकार होय. खरे तर यामुळे ती आणखी कणखर बनली आहे. दिव्या खोसला दिग्दर्शित  ‘सनम रे’ हा चित्रपट १२ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. यात ही जोडी दिसणार आहे.

Web Title: Shweta and I did not create for each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.