श्रुती मोदीचे वकील म्हणाले- हाच द्यायचा सुशांत आणि रियाला ड्रग्स, बॉलिवूडमधील ड्रग्स पेडलर्सचे नाव उघड
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2020 14:10 IST2020-09-02T13:24:07+5:302020-09-02T14:10:13+5:30
सुशांत सिंग राजपूत मृत्यप्रकरणाला दरदिवशी एक नवं वळण लागतंय.

श्रुती मोदीचे वकील म्हणाले- हाच द्यायचा सुशांत आणि रियाला ड्रग्स, बॉलिवूडमधील ड्रग्स पेडलर्सचे नाव उघड
सुशांत सिंग राजपूत मृत्यप्रकरणाला दरदिवशी एक नवं वळण लागतंय. सुशांतची एक्स मॅनेजर श्रुती मोदीचे वकील अशोक सरावगीने
रोज नवे खुलासे करतायेत. या प्रकरणातील ड्रग्स अँगल समोर आल्यानंतर अशोक यांनी दावा केला आहे की, एका प्रसिद्ध बिल्डरचा मुलगा सुशांत आणि रिया चक्रवर्तीला ड्रग्सचा पुरवठा करायचा.
न्यूज 18 च्या रिपोर्टनुसार, श्रुती मोदीचे वकील अशोक सरावगीने यांनी सांगितले त्या व्यक्तीचे नाव इम्तियाज खत्री आहे. आमदार राम कदम यांनीसुद्धा याआधी या व्यक्तीचे नाव घेतले होते. पुढे ते म्हणाले, जर हा तोच इम्तियाज खत्री असेल तर तो या प्रकरणात सगळ्यात मोठा क्लू ठरु शकतो. याचे धागेदार बॉलिवूडशीदेखील जोडलेले आहेत. महाराष्ट्रातील सिंचन घोट्याळ्यातदेखील खत्री कुटुंबाचे नाव आले आहेत. ते पुढे म्हणाले की, खटल्याचा योग्य तपास न केल्याबद्दल मुंबई पोलिसांना दोषी ठरवण्यात येऊ शकते.
कोण आहे इम्तियाज खत्री ?
इम्तियाज खत्रीने 2017 मध्ये, व्हीव्हीआयपी युनिव्हर्सल एंटरटेनमेंट नावाची कंपनी उघडली होती. जी बॉलिवूडमधील नवीन कलाकारांना संधी देते. या कंपनीचा संचालक होता इम्तियाज आली. इम्तियाज बॉलिवूड चित्रपटांमध्येही पैसे लावतो.
Shocking !शौविक पेडलर्सकडून वडील इंद्रजीत चक्रवर्तींसाठी मागवायचा ड्रग्स ?