​श्रेयस नव्या आव्हानात्मक भूमिकेत झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2016 16:19 IST2016-06-09T10:49:32+5:302016-06-09T16:19:32+5:30

सिने रसिकांना हसवून खिळविणाऱ्या आणि बॉक्स आॅफिसवर  १०० कोटींचा गल्ला गाठणारा ‘ग्रँड मस्ती’ चित्रपटाचा लवकरच दुसरा भाग येणार आहे. ...

Shreyas will be seen in a new challenging role | ​श्रेयस नव्या आव्हानात्मक भूमिकेत झळकणार

​श्रेयस नव्या आव्हानात्मक भूमिकेत झळकणार

ने रसिकांना हसवून खिळविणाऱ्या आणि बॉक्स आॅफिसवर  १०० कोटींचा गल्ला गाठणारा ‘ग्रँड मस्ती’ चित्रपटाचा लवकरच दुसरा भाग येणार आहे. दुसऱ्या भागातही पहिल्या भागामधील विवेक ओबेरॉय, रितेश देशमुख, आफताब शिवदासनी हे अभिनेते दिसणार आहेत. पण यांच्याबरोबर मराठमोळा श्रेयस तळपदेही नव्या आव्हानात्मक भूमिकेत झळकणार आहे.

काय आहे श्रेयसचे नवे आव्हान 

श्रेयसने आजवर अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत, पण यावेळी त्याची ही भूमिका जितकी नवीन आहे तितकीच आव्हानात्मकदेखील असणार आहे.
श्रेयस जे पात्र साकारणार आहे त्याचे नाव असणार आहे ‘जिंगलो’ आणि तो पुरुष वेश्याव्यवसाय करणाऱ्याच्या भूमिकेत आहे.

श्रेयससोबतच फिल्ममध्ये आणखी तीन हिरो आणि हिरॉईन असणार आहेत. इंद्र कुमार दिग्दर्शित ग्रँड मस्तीचे ट्रेलर लवकरच लाँच होणार आहे. त्यात श्रेयसची भूमिका बघायला त्याच्या फॅन्सना नक्कीच कुतूहल असणार आहे.

Web Title: Shreyas will be seen in a new challenging role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.