श्रेयस तळपदे पुन्हा करणार हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 06:00 AM2019-11-01T06:00:00+5:302019-11-01T06:00:00+5:30

चित्रपटातील कलाकार सुधीर पांडे, ब्रिजेंद्र काला, श्रध्दा जैसवाल, अनिल चरणजीत, चेतना पांडे उपस्थित होते.

Shreyas Talpade will Direct New Hindi Movie | श्रेयस तळपदे पुन्हा करणार हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन

श्रेयस तळपदे पुन्हा करणार हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन

googlenewsNext


चित्रपट, नाटक, मालिका, संगीत यांची आवड ज्यांना मनापासून असते किंवा या माध्यमांच्या मदतीने आपण प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करायला हवे अथवा करु शकतो अशी भावना ज्यांच्या मनात असते त्या व्यक्ती मनोरंजनसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख बनवण्यासाठी विशेष मेहनत घेत असतात. मग ती व्यक्ती कलाकार, गायक, दिग्दर्शक असू शकते किंवा एखादी नवीन प्रॉडक्शन कंपनी ज्याच्या अंतर्गत अनेक मनोरंजक प्रकल्पांची निर्मिती करण्यात येईल.


‘वेगवेगळ्या जॉनरच्या माध्यमातून, नवीन कथेतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले जावे’, या हेतूने सध्या अनेक नवीन प्रॉडक्शन कंपन्यांची निर्मिती होत आहे. त्यापैकी हरिहरन अय्यर यांची ‘साईश वेंच्युअर सोल्युशन्स प्रा. लि.’ आणि राज भट्टाचार्य यांची ‘ओम साई राज फिल्म्स’ प्रॉडक्शन कंपनी या दोन नवीन प्रॉडक्शन कंपन्या नुकत्याच लाँच करण्यात आल्या आहेत.

 

लाँचिंगनंतर हरिहरन अय्यर आणि राज भट्टाचार्य यांनी त्यांच्या पहिल्या हिंदी चित्रपटाची घोषणा केली ज्याचे नाव आहे ‘सरकार की सेवा में’. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेता श्रेयस तळपदे करणार असून महत्त्वाची भूमिका देखील श्रेयसने साकारली आहे. या प्रॉडक्शन कंपनीच्या लाँचिंग सोहळ्यात निर्माते हरिहरन अय्यर, राज भट्टाचार्य, दिग्दर्शक श्रेयस तळपदे, चित्रपटातील कलाकार सुधीर पांडे, ब्रिजेंद्र काला, श्रध्दा जैसवाल, अनिल चरणजीत, चेतना पांडे उपस्थित होते.


सत्य घटनेपासून प्रेरित असलेला ‘सरकार की सेवा में’ या चित्रपटाच्या नावावरुनच चित्रपटाविषयीची उत्सुकता निर्माण होते की, हा चित्रपट नेमक्या कोणत्या गोष्टीवर आधारित आहे, यामध्ये काय मजेशीर पाहायला मिळणार इत्यादी. प्रेक्षकांना लवकरच या चित्रपटाची झलक आणि श्रेयस तळपदेचे दिग्दर्शन कौशल्य पुन्हा एकदा पाहायला मिळेल.
 

Web Title: Shreyas Talpade will Direct New Hindi Movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.