श्रेयस तळपदेने नव्या सिनेमाची केली घोषणा, 'लव्ह यू शंकर'ची पहिली झलक आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 03:24 PM2024-03-08T15:24:42+5:302024-03-08T15:25:11+5:30

Shreyas Talpade : महाशिवरात्रीच्या पावन दिवशी भगवान शंकराशी संबंधीत असलेल्या कथानकावरील 'लव्ह यू शंकर' या चित्रपटाची रिलीज डेट तारीख घोषित करण्यात आली आहे.

Shreyas Talpade announced a new movie, the first glimpse of 'Love You Shankar' is out | श्रेयस तळपदेने नव्या सिनेमाची केली घोषणा, 'लव्ह यू शंकर'ची पहिली झलक आली समोर

श्रेयस तळपदेने नव्या सिनेमाची केली घोषणा, 'लव्ह यू शंकर'ची पहिली झलक आली समोर

अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) ने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. नुकताच श्रेयसचा अनोखी गाठ हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री गौरी इंगवले मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटानंतर आता महाशिवरात्रीच्या निमित्ताने श्रेयसने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली. लव्ह यू शंकर असे या चित्रपटाचे नाव असून भगवान शंकराशी निगडीत आहे.

महाशिवरात्रीच्या पावन दिवशी भगवान शंकराशी संबंधीत असलेल्या कथानकावरील 'लव्ह यू शंकर' या चित्रपटाची रिलीज डेट तारीख घोषित करण्यात आली आहे. रामनवमीच्या दिवशी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिलीज करण्यात आलेल्या टीझरमध्ये श्रेयस तळपदे दिसतो. या चित्रपटाच्या निमित्ताने श्रेयस शिवभक्ती करताना दिसणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 

श्रेयस तळपदेने लव्ह यू शंकर चित्रपटाची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. त्याने व्हिडीओ शेअर करत लिहिले की, ही अनोखी गाठला सलग दुसऱ्या आठवड्यात तुमच्याकडून प्रेम मिळत असताना...महाशिवरात्रीच्या या शुभ दिवशी माझ्या पुढची घोषणा करत आहे - लव्ह यू शंकर. ज्याप्रमाणे तुम्ही ही अनोखी गाठला अपार प्रेम दिले आहे आणि करत राहा, मला आशा आहे की तुम्ही देखील याचा आनंद घ्याल. हर हर महादेव. प्रेम, भावना आणि साहसाची ही कहाणी तुमच्या आत्म्याला गुंजवेल. लव्ह यू शंकर सिनेमा १९ एप्रिल हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नडमध्ये रिलीज होणार आहे.

श्रेयस व्यतिरिक्त या चित्रपटात तनिषा मुखर्जी, अभिमन्यू सिंग आणि हेमंत पांडे यांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत. राजीव एस. रुईया यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची निर्मिती तेजस देसाई आणि सुनीता देसाई यांनी केली आहे. हिंदीसह तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषांमध्येही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात श्रेयस नेमका कोणत्या भूमिकेत दिसणार आहे ते अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

Web Title: Shreyas Talpade announced a new movie, the first glimpse of 'Love You Shankar' is out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.