श्रद्धा, कॅटरिना नव्हे तर पूजा हेगडे असेल ‘बाहुबली’ प्रभासची हिरोईन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2017 21:26 IST2017-05-16T15:48:45+5:302017-05-16T21:26:41+5:30

सुरुवातीला कॅटरिना कैफ या चित्रपटात प्रभासची हिरोइन असल्याची चर्चा समोर आली होती. त्यानंतर श्रद्धा कपूर हिचे नाव पुढे आले, मात्र आता आलेल्या माहितीनुसार पूजा हेगडे या चित्रपटात प्रभासची हिरोइन असणार आहे.

Shraddha, not Katrina but Pooja Hegde will be 'Bahubali' Prabhas' heroine? | श्रद्धा, कॅटरिना नव्हे तर पूजा हेगडे असेल ‘बाहुबली’ प्रभासची हिरोईन?

श्रद्धा, कॅटरिना नव्हे तर पूजा हेगडे असेल ‘बाहुबली’ प्रभासची हिरोईन?

ाहुबली’ फेम अभिनेता प्रभासच्या आगामी ‘साहो’चा टीजर प्रेक्षकांना एवढा पसंत आला की, प्रत्येकजण या चित्रपटातील प्रभासच्या हिरोइनविषयी जाणून घेण्यास उत्सुक आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून दर दिवसाला वेगवेगळ्या अभिनेत्रींची नावे प्रभाससोबत जोडली जात आहेत. सुरुवातीला कॅटरिना कैफ या चित्रपटात प्रभासची हिरोइन असल्याची चर्चा समोर आली होती. त्यानंतर श्रद्धा कपूर हिचे नाव पुढे आले, मात्र आता आलेल्या माहितीनुसार पूजा हेगडे या चित्रपटात प्रभासची हिरोइन असणार आहे. 

साउथ स्टार बाहुबली प्रभास याच्यासोबत काम करण्यास प्रत्येक अभिनेत्री उत्सुक आहे. ‘बाहुबली’च्या प्रचंड यशानंतर आज प्रभाससोबत काम करण्यास उत्सुक असलेल्या अभिनेत्रींची यादी दरदिवसाला वाढतच आहे. प्रभासच्या आगामी ‘साहो’ या चित्रपटाविषयी बोलायचे झाल्यास, चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला असून, प्रेक्षकांना तो प्रचंड भावत आहे. 



सध्या या चित्रपटासाठी अभिनेत्रीची निवड करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत कॅटरिना कैफ आणि श्रद्धा कपूर हिच्या नावाची चर्चा होती, पण आता अचानकच एक सुखद धक्का देणारी बातमी समोर आली आहे. कारण कॅटरिना, श्रद्धाला मागे टाकत आता पूजा हेगडे हिच्या नावावर विचार केला जात आहे. वृत्तानुसार सध्या पूजा हेगडे हिला साइन करण्याविषयीची बोलणी सुुरू आहे.



पूजाने हृतिक रोशन याच्या ‘मोहनजोदडो’ या चित्रपटातून डेब्यू केला आहे. मात्र अद्यापपर्यंत पूजाने किंवा तिच्या वतीने कोणताही याविषयी दुजोरा दिला नसल्याने तिच्या नावावर शिक्कामोर्तब होणे अजून बाकी आहे, असेच म्हणावे लागेल. सुरुवातीला श्रद्धाचे नाव निश्चित समजले जात होते. तिला चित्रपटाची कथा खूपच आवडली होती. मात्र बजेटमुळे तिचे नाव मागे सारले गेले. या चित्रपटासाठी श्रद्धाने आठ कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र तामिळ चित्रपटांनुसार अभिनेत्रींना एवढे मानधन दिले जात नाही. अशीच काहीसी स्थिती कॅटरिनाबाबतही झाल्याचे समजते. 

Web Title: Shraddha, not Katrina but Pooja Hegde will be 'Bahubali' Prabhas' heroine?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.