​श्रद्धा कपूरच्या ट्विटने खोलली फरहानसोबतच्या तिच्या नात्याची पोल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2017 12:58 IST2017-06-18T06:54:13+5:302017-06-18T12:58:53+5:30

श्रद्धा कपूर व फरहान अख्तर यांच्या लव्ह -अफेअरबद्दल तुम्ही अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या असतीलच. काही महिन्यांपूर्वी फरहानने पत्नी अधुनाला ...

Shraddha Kapoor's tweet opens her husband's pole with Farhan! | ​श्रद्धा कपूरच्या ट्विटने खोलली फरहानसोबतच्या तिच्या नात्याची पोल!

​श्रद्धा कपूरच्या ट्विटने खोलली फरहानसोबतच्या तिच्या नात्याची पोल!

रद्धा कपूर व फरहान अख्तर यांच्या लव्ह -अफेअरबद्दल तुम्ही अनेक बातम्या तुम्ही ऐकल्या असतीलच. काही महिन्यांपूर्वी फरहानने पत्नी अधुनाला घटस्फोट दिला. यानंतर त्याचे नाव श्रद्धाचे जोडले गेले. चर्चा खरी मानाल तर दोघेही लिव्ह इन रिलेशनमध्ये आहेत. अर्थात या सगळ्या चर्चाच. कारण श्रद्धा व फरहान या दोघांपैकी कुणीही या चर्चेला अधिकृत दुजोरा दिला नाही. पण शेवटी मनातले ते ओठांवर येते, असे म्हणतात, ते उगाच नव्हे. प्रत्यक्षात नाही पण ट्विटरवर का होईना, सत्य समोर आलेच. होय, आजपर्यंत श्रद्धा व फरहानने जे शब्दांत व्यक्त केले नाही, ते ट्विटरवरून समोर आले. अलीकडे श्रद्धाने ‘हसीना’ या तिच्या आगामी चित्रपटाचा टीजर ट्विटरवर शेअर केला होता. श्रद्धाने हा टीजर तिच्या अकाऊंटवर शेअर केला आणि दुस-या क्षणाला फरहानने त्यावर प्रतिक्रिया दिली. फरहानने यातील श्रद्धाच्या अभिनयाची मुक्तकंठाने प्रशंसा केली.


  आता फरहानच्या तोंडून स्वत:ची स्तुती ऐकून श्रद्धा आपल्या भावना रोखू शकली नाही. तिनेही क्षणही न घालवता फरहानला आभारी आहे, असा रिप्लॉय दिला. पण केवळ एवढेच नाही. तर हा रिप्लाय देताना त्यात आवर्जुन लव्ह इमोजी अ‍ॅड केला. आता या लव्ह इमोजीचा अर्थ काय, हे आम्ही तुम्हाला समजवण्याची गरज नाहीच. अखेर श्रद्धाने कोड लँग्वेजमध्ये फरहानचे आभार का मानलेत, हे तुम्ही चांगलेच समजू शकता.
श्रद्धा कपूर व फरहान अख्तर हे दोघेही ‘रॉक आॅन2’च्या सेटवर एकत्र आलेत. ‘रॉक आॅन2’ तर बॉक्सआॅफिसवर चालला नाही. पण फरहान व श्रद्धाच्या प्रेमाची गाडी मात्र सुसाट पळत सुटली. आता ही गाडी कुठल्या मुक्कामाला पोहोचते, ते बघूयात!

Web Title: Shraddha Kapoor's tweet opens her husband's pole with Farhan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.