फरहान अख्तरसाठी श्रद्धा कपूरजवळ नाही वेळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2017 16:29 IST2017-06-01T10:59:03+5:302017-06-01T16:29:03+5:30
श्रद्धा कपूर आणि फरहान अख्तरच्या सीक्रेट लिंकअपच्या बातम्या तुम्ही वाचल्या असालच. दोघेही एकमेकांच्या अतिशय जवळ आहेत. फरहानसाठी श्रद्धा स्वत:चे ...
.jpg)
फरहान अख्तरसाठी श्रद्धा कपूरजवळ नाही वेळ!
श रद्धा कपूर आणि फरहान अख्तरच्या सीक्रेट लिंकअपच्या बातम्या तुम्ही वाचल्या असालच. दोघेही एकमेकांच्या अतिशय जवळ आहेत. फरहानसाठी श्रद्धा स्वत:चे घर सोडायला तयार आहे, असे काय काय तुमच्या कानावर आले असेल. ‘रॉक आॅन2’च्यादरम्यान श्रद्धा व फरहानमधील जवळीक वाढली आणि नंतर वाढतच गेली.
![]()
फरहानसोबतच्या रिलेशनवर श्रद्धाच्या घरचे नाराज असल्याची खबरही यावेळी आली. अर्थात श्रद्धाने या सगळ्या बातम्या निव्वळ अफवा असल्याचेच सांगितले. यालाच धरून सध्या एक नवी बातमी कानावर आलीय. ती म्हणजे, श्रद्धाच्या आयुष्यात आता फरहानसाठी काहीही जागा उरलेली नाही. श्रद्धा सध्या तिचे सगळे लक्ष कामावर देते आहे आणि ती एकदम सिंगल आहे. श्रद्धाच्या एका जवळच्या व्यक्तिने दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा तिच्या व फरहानच्या लिंकअपच्या बातम्या ऐकून ऐकून वैतागलीय. खरे तर लोकांनी आपल्या कामाबद्दल बोलावे, असे श्रद्धाला वाटते. पण लोक यापेक्षा तिच्या खासगी आयुष्याबद्दलच अधिक बोलतात, याचा श्रद्धाला वैताग आलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धाकडे कुठल्याही रिलेशनशिपसाठी वेळ नाही. एकंदर काय तर ती फक्त तिच्या कामावर लक्ष केंद्रीत करते आहे.
भूतकाळ विसरून श्रद्धा आपल्या आयुष्यात पुढे जाऊ इच्छिते आहे की, यशाच्या शिखरावर विराजमान व्हायची तिची इच्छा आहे? आता नेमके काय, हे श्रद्धाच जाणो. पण श्रद्धा कामावर लक्ष केंद्रीत करणार असेल, तर ती चांगलीच गोष्ट म्हणायला हवी. नुकताच श्रद्धाचा ‘हाफ गर्लफ्रेन्ड’ हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाला अपेक्षेनुसार, चांगले यश मिळाले. सध्या श्रद्धा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर हिच्या आयुष्यावरील बायोपिकमध्ये बिझी आहे.