ह्रतिक रोशनच्या क्रिश ४मध्ये झाली चुलबुली गर्ल श्रद्धा कपूरची एंट्री?, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2023 13:09 IST2023-10-21T13:07:47+5:302023-10-21T13:09:14+5:30
२०१३ साली श्रद्धाने 'आशिकी २' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटाने तिला लोकप्रियता मिळवून दिली.

ह्रतिक रोशनच्या क्रिश ४मध्ये झाली चुलबुली गर्ल श्रद्धा कपूरची एंट्री?, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण
श्रद्धा कपूर ही बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. २०१३ साली श्रद्धाने 'आशिकी २' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पहिल्याच चित्रपटाने तिला लोकप्रियता मिळवून दिली. स्टार किड असलेल्या श्रद्धाने अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पाडली. श्रद्धा अनेकवेळा फोटोगग्राफरशी मराठीत संवाद साधताना दिसतेय. श्रद्धाचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते. श्रद्धा ह्रतिकसोबत 'क्रिश ४'मध्ये झळकणार अशी चर्चा सुरु आहे.
अलिकेडच श्रद्धाने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर होते. याफोटोंमध्ये ती उन्हात बसलेली दिसत आहेत. चेहऱ्यावर पडणाऱ्या सूर्याची किरणात तिचं सौंदर्य आणखीनच खुलून दिसतंय. हे फोटो शेअर करताना तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'जादूप्रमाणे मलाही सूर्यप्रकाशाची गरज आहे'. श्रद्धाच्या या फोटोंवर हृतिक रोशननेही कमेंट केली होती. हृतिकने लिहिलं, 'तो येत आहे. त्याला सांगेन'. याला उत्तर देताना श्रद्धाने लिहिले की, 'खरंच..?...तो कधी आणि कुठे येतोय'. श्रद्धा कपूरच्या या फोटोंवर हृतिक रोशनच्या कमेंटनंतर, लोक असा अंदाज लावत आहेत की दोघेही क्रिश 4 या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, श्रद्धा कपूर शेवटची 'तू झुठी मैं मक्कर' मध्ये दिसली होती. मार्चमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात तिच्यासोबत रणबीर कपूर दिसला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला. आता श्रद्धा कपूरकडे अनेक चित्रपट आहेत. श्रद्धा कपूर आता 'स्त्री 2', 'नागिन' सारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. श्रद्धा कपूरच्या या चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.