​ दिवाळीच्या शुभेच्छा देणे श्रद्धा कपूरला पडले महाग! सांगायला गेली एक, झाले भलतेच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2017 15:21 IST2017-10-15T09:51:26+5:302017-10-15T15:21:26+5:30

दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा’, असे म्हणत श्रद्धाने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला. इन्स्टाग्रामवरही तिने हा व्हिडिओ शेअर केला.पण, कदाचित नेटक-यांना श्रद्धाचा हा व्हिडिओ फार रूचला नाही.

Shraddha Kapoor fell Happy Diwali! One has been told to tell, did it happen! | ​ दिवाळीच्या शुभेच्छा देणे श्रद्धा कपूरला पडले महाग! सांगायला गेली एक, झाले भलतेच!

​ दिवाळीच्या शुभेच्छा देणे श्रद्धा कपूरला पडले महाग! सांगायला गेली एक, झाले भलतेच!

वाळी म्हणजे सर्वांचाच आवडीचा सण. बॉलिवूडचे सेलिब्रिटीही याला अपवाद नाही. सध्या बॉलिवूड सेलिब्रिटीही दिवाळीच्या तयारीत गुंतले आहे. एकमेकांच्या घरची प्री दिवाळी पार्टी एन्जॉय करण्याचे, एकमेकांना शुभेच्छा- भेटवस्तू देण्याचे सत्र सध्या बॉलिवूडमध्ये सुरु आहे. तुमची आमची लाडकी अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने मात्र कुणाच्या प्री-दिवाळी पार्टची शान वाढवण्याआधी आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देणे योग्य समजले. दिवाळीच्या शुभेच्छा देणारे  एक ट्विट तिने केले. विशेष म्हणजे, या ट्विटमधून एक महत्त्वाचा संदेशही तिने दिला. यंदाची दिवाळी फटाक्यांशिवाय साजरी करा. फटाके खरेदी करु नका, अशी विनंती तिने केली. ‘दिवाळी  आली आहे. अर्थात हा सण ध्वनी आणि वायू प्रदूषणासाठी नाही तर आनंदाच्या आणि प्रकाशाच्या उत्सवासाठी आहे. तुमच्या-आम्नच्या आजुबाजूला असलेली हवा स्वच्छ ठेवण्यासाठी तुमचं योगदान द्या. रस्त्यावरील प्राण्यांचीही काळजी घ्या. त्यांच्याप्रती सहानुभूती दाखवा. फटाके खरेदी करु नका. तुमच्या जवळच्या लोकांसोबत या सणाचा आनंद घ्या. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा’, असे म्हणत श्रद्धाने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला.  इन्स्टाग्रामवरही तिने हा व्हिडिओ शेअर केला.पण, कदाचित नेटक-यांना श्रद्धाचा हा व्हिडिओ फार रूचला नाही. मग काय, त्यांनी तिला चांगलेच फैलावर घेतले. या व्हिडिओवरून श्रद्धाला ट्रोल व्हावे लागले.




  एका ट्विटर युजरने थेट श्रद्धाच्या चित्रपटांच्या प्रमोशनच्या वेळचा एक फोटो पोस्ट करत श्रद्धाच्या दुटप्पीपणावर बोट ठेवले. या फोटोमध्ये फटाक्यांच्या वापर केल्याचे दिसत आहे. याच फोटोच्या पार्श्वभूमीवर ‘ दिवाळीला फटाके वाजवू नका, ते श्रद्धाच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जपून ठेवा’, असा उपरोधिक फटका एका या युजर्सने लगावला.



काही युजर्सनी ईदच्या दिवशी हेच सेलिब्रिटी प्राण्यांचा बळी देतात याकडे  लक्ष वेधले. काहींनी तर श्रद्धाच्याच सोशल मीडिया पोस्टचा वापर करत तिच्यावरच निशाणा साधला. ‘तुझे ज्ञान तुझ्याजवळ ठेव,’ असे म्हणत एकाने श्रद्धाला लक्ष्य केले.
फटाक्यांवरील बंदीच्या मुद्यावरूनच काही दिवसांपूर्वी नेटिजन्सनी फॅशन डिझाईनर मसाबा गुप्ता हिला ट्रोल केले होते.

Web Title: Shraddha Kapoor fell Happy Diwali! One has been told to tell, did it happen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.