श्रद्धा कपूर आणि तापसी पन्नू घेतला नवा आशियाना !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2017 16:31 IST2017-08-03T10:49:27+5:302017-08-03T16:31:57+5:30
तापसी आणि श्रद्धा बॉलिवूडमध्ये टॉपच्या अभिनेत्री आहेत. बॉलिवूडमध्ये यशस्वी होण्याचे स्वप्न पूर्ण होता होता त्यांचे अजून एक स्वप्न पूर्ण ...

श्रद्धा कपूर आणि तापसी पन्नू घेतला नवा आशियाना !
त पसी आणि श्रद्धा बॉलिवूडमध्ये टॉपच्या अभिनेत्री आहेत. बॉलिवूडमध्ये यशस्वी होण्याचे स्वप्न पूर्ण होता होता त्यांचे अजून एक स्वप्न पूर्ण झाले ते म्हणजे मुबंईत घर घेण्याचे. या दोघींनी नुकतेच मुंबईत स्वत:चे घर खरेदी केले आहे.
नुकताच तापसीने आपला ३०वा वाढदिवस साजरा केला आणि वाढदिवसाला तिने स्वतःलाच नवे घरं गिफ्ट केले. आता ती ३ बीएचकेची मालकिण झाली आहे. एका मुलाखतीत तापसीला नव्या घरात कधी शिफ्ट होणार यावर प्रश्न विचारण्यात आले असता यावर ती म्हणाली, नव्या घराच्या इंटेरिअलची जबाबदारी मी माझ्या बहिणीला दिली आहे. या वर्षीची दिवाळी फॅमिलीसोबत मी नव्या घरात साजरी करणार आहे. ‘चश्मेबद्दूर’ या चित्रपटातून तापसीने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. मात्र तिला खरी ओळख पिंक या चित्रपटातून मिळाली. नुकतेच तिने डेव्हिड धवन यांच्या जुडवा2 या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली आहे.
ALSO READ : साऊथची ‘सनसनी’ तापसी पन्नू बॉलिवूडमध्ये येण्याआधी करायची हे काम!
तापसीप्रमाणे श्रद्धाने ही मुंबईत नवा अशियाना विकत घेतले आहे. आई-वडिलांच्या सोसायटीत तिने फ्लॉट विकत घेतला आहे. श्रद्धा म्हणते हे घर माझ्या कामासाठी मी घेतले आहे. या घरात मी व्यायाम, डान्स, स्क्रिप्टचे वाचन या गोष्टी करते.
श्रद्धा लवकराच 'हसीना पारकर' या चित्रपटात दिसणार आहे त्यात ती दाऊद च्या बहिणीची भूमिका करते आहे. या चित्रपटात श्रद्धाच्या लुकची खूप चर्चा आहे. श्रद्धाचा भाऊ सिद्धार्थ कपूरदेखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. सिद्धार्थ यात दाऊदची भूमिका साकारतो आहे. तसेच श्रद्धा प्रभाससोबत साहोमध्ये सुद्धा दिसण्याची चर्चा आहे.
ALSO READ : श्रद्धा कपूरने 'या' चित्रपटात काम करण्यासाठी घेतले 4 कोटी !