श्रद्धा कपूर-आदित्य कपूर एकमेकांना का म्हणतात,‘एनीटाईम फ्रेंड्स’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 12:23 IST2017-01-13T12:23:37+5:302017-01-13T12:23:37+5:30

‘आशिकी २’ चित्रपटातून अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांनी एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारी जोडी सिद्ध केली. ...

Shraddha Kapoor and Aditya Kapoor are calling each other, 'Animeime Friends'? | श्रद्धा कपूर-आदित्य कपूर एकमेकांना का म्हणतात,‘एनीटाईम फ्रेंड्स’?

श्रद्धा कपूर-आदित्य कपूर एकमेकांना का म्हणतात,‘एनीटाईम फ्रेंड्स’?

शिकी २’ चित्रपटातून अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांनी एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारी जोडी सिद्ध केली. पडद्यावरील ते सर्वांत ‘लव्हेबल कपल’ असलं तरीही ते उत्तम मित्र असू शकत नाहीत का? अर्थात असू शकतात. ते दोघे  एकमेकांचे ‘एनीटाईम फ्रेंड्स’ आहेत. हे आम्ही नव्हे तर त्यांनी स्वत:च अलीकडेच एका टीव्ही शोवर त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केले. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते तिथे गेले होते. 

                              

‘आशिकी २’ या चित्रपटानंतर आदित्य-श्रद्धाच्या जोडीचे अनेक फॅन्स झाले. चित्रपटातील गाण्यांना यूट्यूबवर प्रचंड हिट्स मिळाले. पावसात एकमेकांना किस करण्याच्या त्यांच्या अनोख्या स्टाईलचेही लाखो दिवाने झाले. युवापिढीला त्यांच्या हटके स्टाईलने अक्षरश: वेड लावणारी ही जोडी आता म्हणतेय की, ‘आम्ही एकमेकांचे खुप चांगले मित्र आहोत. वेळी-अवेळी आम्ही एकमेकांना फोन करून मदत मागतो. एक मित्र दुसऱ्या मित्राच्या अडचणीला नेहमी धावून जातो. आदित्यने या मैत्रीला ‘४ ए.एम.फ्रेंड्स’ असे नाव ठेवले आहे म्हणजेच पहाटे ४ वाजता जरी मित्राने मदत मागितली तरी आम्ही तत्पर असतो. आम्ही एकमेकांचे ‘एनीटाईम फ्रेंड्स’ आहोत.’ 

                              

आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर यांचा ‘ओके जानू’ हा चित्रपट रिलीज झाला. दाक्षिणात्य ब्लॉकबस्टर ‘ओके कन्मनी’चा ‘ओके जानू’ हा हिंदी रिमेक आहे. ओके कन्मनी आणि ओके  जानू या दोन्ही चित्रपटामध्ये बºयाच सीन्सचे साम्य दिसून येत आहे. तरीही या चित्रपटातील आदित्य-श्रद्धा यांची केमिस्ट्री कशी असणार आहे? अशी उत्सुकता चाहत्यांना  लागली आहे. 

Web Title: Shraddha Kapoor and Aditya Kapoor are calling each other, 'Animeime Friends'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.