शो मॅन राज कपूरची गाजलेली प्रेमप्रकरणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2017 15:39 IST2017-01-27T10:09:53+5:302017-01-27T15:39:53+5:30
शोमॅन म्हटलं की एकच नाव समोर येते ‘राज कपूर’. बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या राज कपूर यांनी बॉलिवूडमध्ये कित्येक दशके आपला ...

शो मॅन राज कपूरची गाजलेली प्रेमप्रकरणे
श मॅन म्हटलं की एकच नाव समोर येते ‘राज कपूर’. बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या राज कपूर यांनी बॉलिवूडमध्ये कित्येक दशके आपला दबदबा राखला. त्यांच्या सिनेमांचे लाखो दिवाने आहेत. त्यांनी काढलेले चित्रपट अजूनही लोकांना आवडतात. त्यांची सिनेमातील कारकीर्द खूप गाजली. त्याचबरोबर त्यांचे प्रेमप्रकरणही तितकेच गाजले. नर्गिस यांच्यासोबतची लव्ह स्टोरी अजूनही अनेकांना आदर्शवत वाटते. राज कपूर यांच्या लव्ह स्टोरीजबाबत...
![]()
श्री ४२० चित्रपटातील प्यार हुआ इकरार हुआ हे गाणं पाहिल्यानंतर प्रत्येकाला राज कपूर आणि नर्गिस यांच्यातील केमिस्ट्री लक्षात येते. राज कपूर यांचा मुलगा ऋषी कपूर यानेही या दोघांचे प्रेमप्रकरण होते, हे आपल्या आत्मचरित्रात मान्य केले. राज कपूर आणि नर्गिस यांचे प्रेमप्रकरण सुरू झाले त्यावेळी नर्गिस या १९ वर्षे वयाच्या होत्या. नर्गिस म्हणजे आर. के. स्टुडिओजच्या मुख्य अभिनेत्री. या दोघांमध्ये सुमारे १० वर्षे प्रेमप्रकरण सुरू होते. हिंदी सिनेमातील हे पहिले फेव्हरेट कपल होते, जे लोकांना खूप आवडायचे. या दोघांनी एकमेकांसोबत तब्बल १६ चित्रपट केले.
![]()
नर्गिस यांनी केवळ राज कपूर यांच्या चित्रपटात काम केले. त्यांनी आर. के. बॅनरशिवाय चित्रपट करणे बंद केले. राज कपूर यांचे पहिले लग्न झाले आहे, हे माहिती असतानाही नर्गिस त्यांच्या प्रेमात पडल्या होत्या. राज कपूर यांना दुसरे लग्न करता येईल का? याबाबत त्यांनी अनेकांशी सल्लामसलतही केली होती.
राज कपूर यांचे तत्पूर्वी मीना कुमारी यांच्याशी प्रेमप्रकरण सुरू होते. राज कपूर यांनी कृष्णा राज यांच्याशी लग्न केले होते. त्याशिवाय त्यांना मुलेही होती. त्यामुळे राज कपूर हा प्रामाणिक नवरा नसल्याचे नर्गिस यांना वाटले. त्याशिवाय दुसरी बायको म्हणून नर्गिस यांना रहावयाचे नव्हते. नर्गिस यांची या दरम्यान सुनील दत्त यांच्याशी भेट झाली. पुढे या दोघांनी लग्न केले. नर्गिस सोडून गेल्यानंतर राज कपूर प्रचंड अस्वस्थ झाले. त्यांच्यात नैराश्य आले. स्वत:ला त्यांनी कोंडून घेतले. कित्येक तास ते रडत रहायचे. या काळात ते व्यसनी झाले.
![]()
मास्को येथे एका कार्यक्रमास गेल्यानंतर आपल्याला राज कपूर यांच्यापेक्षा कमी महत्त्व दिले जात असल्याचे नर्गिस यांना जाणवले. राज कपूर यांना थंडी आणि ताप आला असताना नर्गिस त्यांना सोडून निघून गेल्यानंतर अभिनेत्री पद्मिनी यांनी त्यांची सेवासुश्रुशा केली.
![]()
यानंतर राज कपूर आणि पद्मिनी यांच्यात प्रेमप्रकरण सुरू झाले. पुढे या दोघे सिनेमात एकत्र काम करताना दिसून आले. मेरा नाम जोकरमध्ये पद्मिनी यांची महत्त्वाची भूमिका होती. पद्मिनी यांच्यासोबत राज कपूर यांनी बराच काळ घालविला.
![]()
राज कपूर यांचे पुढे वैजयंतीमाला आणि झीनत अमान यांच्याशीही नाव जोडले गेले.