​लघुपटामुळे मिळाली नवी ओळख !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2017 18:01 IST2017-01-05T17:49:22+5:302017-01-05T18:01:15+5:30

-Ravindra More ‘कबुल है’, ‘हिना’, ‘चंद्रकांता’ आदी प्रसिद्ध टी. व्ही. सिरीयल्समधून प्रकाशझोतात आलेला अभिनेता वकार शेख गेल्या दीड दोन ...

Shortlisted introduction! | ​लघुपटामुळे मिळाली नवी ओळख !

​लघुपटामुळे मिळाली नवी ओळख !

ong>-Ravindra More

‘कबुल है’, ‘हिना’, ‘चंद्रकांता’ आदी प्रसिद्ध टी. व्ही. सिरीयल्समधून प्रकाशझोतात आलेला अभिनेता वकार शेख गेल्या दीड दोन वषार्पासून ‘शॉर्ट फिल्म्स्’ मध्ये काम करतोय. त्याच्या ‘टी स्पून’ या शॉर्ट फिल्मला ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार मिळाला असून, त्यामुळे अभिनय क्षेत्रात नवी ओळख मिळाल्याचे त्याला वाटतेय. त्याच्या पुढील प्लॅनिंग संदर्भात ‘लोकमत सीएनएक्स’शी मारलेल्या गप्पा...

* कोणत्या प्रकारच्या सिरीयल्समधून काम करायला आवडते?
- सध्या सिरीयल म्हटले म्हणजे लव्हस्टोरी, फॅमिली ड्रामा अशाप्रकारच्या आशयाला प्राधान्य दिले जाते. त्यातच मेन रोल मिळणे याचाही विचार केला जातो. मात्र, मला यांपैकी कॉमेडी टाईपच्या सिरीयल्स करायला आवडेल. माझा लूक पाहून म्हणजेच माझ्या चेहºयावरील गांभीर्यता पाहून मला कॉमेडी रोल मिळतच नाही. 

* शॉर्ट फिल्मकडे कसे व का वळले?
-सिरीयल्समध्ये काम करणे म्हणजे पूर्ण वेळ बांधून घेणे होय. शिवाय करियरला मर्यादा येते. त्यामुळे एवढ्यावरच न थांबता बॉलिवूड चित्रपटांमध्ये संधी मिळण्यासाठी परफेक्ट असणे गरजेचे आहे. म्हणूनच दोन वषार्पासून शॉर्ट फिल्म्स् करतोय. 

* शॉर्ट फिल्म्स् धून काय साध्य होते?
-आतापर्यंत भरपूर शॉर्ट फिल्म्स् केल्या असून, मुख्य भूमिका केली आहे. त्यामुळे अभिनय कला विकसित झाली. त्यामुळे ‘टी स्पून’ला दादासाहेब फाळके पुरस्कार आणि ‘ऐतबार’ला दुबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये अ‍ॅवार्ड मिळाला. ‘द मॅजिक गिव्हिंग‘, ‘बंदी’ या शॉर्ट फिल्मदेखील खूपच प्रसिद्ध झाल्या असून, यशराज बॅनर्सची ‘सब ठिक है’ ही शॉर्ट फिल्म २०१७ मध्ये रिलीज होणार आहे. 

* सरबजीत चित्रपटाचा अनुभव कसा वाटला?
- ‘सरबजीत’मध्ये मी एका जेलरची भूमिका साकारली आहे. त्यात रणदीप हुडाचा जेलमधील २० वर्षाचा प्रवास दर्शविण्यात आला आहे. साहजिकच जेलर असल्याने त्याच्यासोबतचा माझाही प्रवास दाखविण्यात आला आहे. रणदीप आणि ऐश्वर्याच्या अभिनयातूनही मला बरेच शिकायला मिळाले.  

* यावर्षीचे काय प्लॅनिंग आहे?
- या संपूर्ण वषार्साठी मी खूप व्यस्त असून, दोन हिंदी चित्रपट साइन करतोय. अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यावरील एक ऐतिहासिक शो करणार आहे. तसेच ना हिंदी, ना इंग्लिश अशी ‘स्कॅम बॅम थॅँक्यू मॅम‘ ही हिंग्लिश शॉर्टफिल्म करणार आहे. ‘मिट्टी’ या पंजाबी चित्रपटाचा सिक्वल ‘मिट्टी-२’मध्ये लिड रोल करायला मिळतोय.

Web Title: Shortlisted introduction!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.