शॉर्टफिल्म उत्तम प्लॅटफॉर्म -राधिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 10:11 IST2016-01-16T01:19:11+5:302016-02-09T10:11:41+5:30

म राठमोळी अभिनेत्री राधिका आपटे 'अहिल्या' या तिच्या शॉर्टफिल्म मुळे मागच्या काही दिवसात चर्चेत होती. शॉर्टफिल्म बाबत बोलताना राधिका ...

Short Film Best Platform - Radhika | शॉर्टफिल्म उत्तम प्लॅटफॉर्म -राधिका

शॉर्टफिल्म उत्तम प्लॅटफॉर्म -राधिका

राठमोळी अभिनेत्री राधिका आपटे 'अहिल्या' या तिच्या शॉर्टफिल्म मुळे मागच्या काही दिवसात चर्चेत होती. शॉर्टफिल्म बाबत बोलताना राधिका म्हणाली, 'अनुभवासाठी आणि आपल्यातले टॅलेंट दाखविण्यासाठी शॉर्टफिल्म हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. मोठी गुंतवणूक नसल्यामुळे यात वेगवेगळे प्रयोग करणे सहज शक्य आहे.' २00५ साली 'वाह लाईफ हो तो एैसी' या चित्रपटाद्वारे बॉलीवूड मध्ये पदार्पण करणार्‍या राधिकाने आतापर्यंत खूप वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. त्याचत्याच प्रकारच्या भूमिका वारंवार करायला तिला आवडत नाही. अनुराग कश्यप, अनुराग बसू, सुजॉय घोष, श्रीराम राघवन, हर्ष, केतन मेहता, लीना यादव या दिग्दर्शकांसोबत पुन्हा एकदा काम करायला आवडेल असे राधिकाने सांगितले.

Web Title: Short Film Best Platform - Radhika

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.