Shocking : नरकयातना भोगून बानी जे कमावते मसल्स!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2017 14:48 IST2017-05-26T09:18:39+5:302017-05-26T14:48:39+5:30
बॉलिवूडमध्ये फिटनेस वा मसल्ससाठी ओळखली जाईल, अशी एकही अभिनेत्री नाही. कदाचित त्याचमुळे बानी जे सगळ्यांना मागे सोडत केवळ आपल्या मसल्ससाठी नाही नाही त्या वेदनांतून जात आहे

Shocking : नरकयातना भोगून बानी जे कमावते मसल्स!
‘ िग बॉस10’ची वादग्रस्त स्पर्धक बानी जे यासंपूर्ण सीझनदरम्यान तिचा फिटनेस आणि लूक यावरून बरीच चर्चेत राहिली. बानीला फिटनेसचे प्रचंड वेड आहे. तिच्या सोशल अकाऊंटवर गेले की, याची कल्पना येते. बानी रोज हेल्थ व जिमशी संबंधित स्वत:चे फोटो पोस्ट करत असते. ‘बिग बॉस10’च्या एका टास्कदरम्यान बानीला जिममध्ये जाण्यास मनाई करण्यात आली होती. यावेळी बानीचा पारा चांगलाच चढला होता. ती प्रचंड संतापली होती. खरे तर बॉलिवूडमध्ये फिटनेस वा मसल्ससाठी ओळखली जाईल, अशी एकही अभिनेत्री नाही. कदाचित त्याचमुळे बानी सगळ्यांना मागे सोडत केवळ आपल्या मसल्ससाठी नाही नाही त्या वेदनांतून जात आहे. होय, तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे खरे आहे. या मसल्ससाठी एक चायनीज कपिंग थेरपी केली जाते. या थेरपीच्या वेदना असह्य असतात. बानीने स्वत: याची माहिती दिली आहे. सोशल अकाऊंटवर स्वत:चा या थेरपीदरम्यानचा एक फोटो तिने पोस्ट केला आहे. ‘यावेळी मी नरकात आहे’, असे तिने याखाली लिहिले आहे. या संपूर्ण पोस्टमध्ये बानीने या थेरपीबद्दल बरीच धक्कादायक माहितीही शेअर केली आहे.
ALSO READ : OMG!! मुंबईच्या बिचवर किस करताना दिसल्या व्हीजे बानी व सपना भवनानी!
गुरबानी जज असे खरे नाव असलेली बानी तिच्या टॅटूसाठीही ओळखली जाते. बानीने अंगभर टॅटू गोंदवले आहेत. ‘रोडिज’ सीझन4ची रनरअप राहिलेल्या बानीला याच शोने लोकप्रिय बनवले. यानंतर याच शोचे पाचवे सीझन ती होस्ट करताना दिसली होती. ‘खतरों के खिलाडी’मध्येही ती दिसली आहे. विकास गुप्ताच्या ‘रानी महल’ या चित्रपटात बानी मुख्य भूमिकेत होती.