SHOCKING: काय सांगता, सलमान खानचे वय ६४?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2017 11:01 IST2017-01-16T10:59:05+5:302017-01-16T11:01:50+5:30

बॉलीवूडचा ‘दबंग’ म्हणून मिरवणाऱ्या सलमान खानबद्दल एक शॉकिंग गोष्ट समोर आली आहे. गेल्या २७ डिसेंबरला ५१ वा वाढदिवस साजरा ...

Shocking: What's the point, Salman Khan is 64 years old? | SHOCKING: काय सांगता, सलमान खानचे वय ६४?

SHOCKING: काय सांगता, सलमान खानचे वय ६४?

लीवूडचा ‘दबंग’ म्हणून मिरवणाऱ्या सलमान खानबद्दल एक शॉकिंग गोष्ट समोर आली आहे. गेल्या २७ डिसेंबरला ५१ वा वाढदिवस साजरा करणाऱ्या सल्लूमियाचे खरे वय ५१ नसून ६४ आहे. त्याच्या मतदान ओळखपत्रावर तरी तसे दिले आहे. ऐकून चकित झालात ना? अहो आम्ही पण झालो!

पण याआधी की तुम्ही काही अंदाज-आराखडे बांधाल त्याआधीच आम्ही सांगून टाकतो की, ते मतदान ओळखपत्र खोटे आहे. सध्या इंटरनेटवर सलमान खानचे तथाकथिक व्होटर आयडी व्हायरल होत आहे. यामध्ये मतदाराचे नाव सलमान आणि वडिलांचे नाव सलीम दिले आहे. इतकेच नाही तर त्यावर सलमानचा फोटोदेखील आहे. या आयडीनुसार सलमानचे वय ६४ असल्याचा दावा करण्यात आला आहे. 

                                    Salman Voter id

तर हे ओळखपत्र खोटे आहे हे काही वेगळे सांगायला नको. ‘द ग्रेटर हैदराबाद’च्या मनपा निवडणुकीदरम्यान हे ओळखपत्र समोर आले होते. तसे पाहिले गेले तर अशा घटना अधुनमधून समोर येतच असतात. गेल्या वर्षी हैदराबाद येथे झालेल्या स्थानिक निवडणुकांच्या काळात हे नकली ओळखपत्र खूपच गाजले होते. आपल्याकडे व्होटर आयडीमध्ये घोटाळे होणे तशी नवीन गोष्ट नाही. कधी नावच चुकते तर कधी वय तर कधी लिंगसुद्धा चुकीचे छापून येते. कधी पत्ताच दुसरा असतो तर कधी आपले नाव फोटो दुसऱ्या कोणाचा तरी असतो.

अशाच चुकीतून सलमान नावाच्या एका व्यक्तीचे ज्याच्या वडीलांचे नावसुद्धा सलीम आहे, त्याचे हे ओळखपत्र असून त्यावर चुकून सलमानचा फोटो लावण्यात आला. बरं ही खरंच चूक आहे की, कोणी तरी संगणकाची मदत घेऊन खट्याळपणा केला आहे, हे अद्याप स्पष्ट नाही. कारण सलमानसारख्या अतिलोकप्रिय स्टारच्या नावे असे ओळखपत्र इश्यू करणे जरा अतिच झाले.

तसे पाहिले गेले तर आपल्या देशात सलमान नावाच्या लोकांची संख्या कमी नाही. बरं यांपैकी असे सुद्धा अनेक लोक भेटतील ज्यांच्या वडिलांचे नाव सलीम आहे. पण खरा प्रश्न आहे की, त्या व्यक्तीच्या ओळखपत्रावर सलमानच फोटो कसा? अशीच चूक झालीच कशी? सलमान खानला हैदराबादचा रहिवासी करून तर ज्याने कोणी हे केले असेल त्याने कमालच केली.

Web Title: Shocking: What's the point, Salman Khan is 64 years old?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.