SHOCKING ! ​सलमान खान, आमिर खान, माधुरी दीक्षितचे सगळे काही विकल्या गेले!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2017 12:36 IST2017-07-30T07:06:14+5:302017-07-30T12:36:14+5:30

शीर्षक वाचून धक्का बसला ना. पण आम्ही बोलतोय, ते लिलावाबद्दल. होय, बॉलिवूड सुपरस्टार्सनी आपल्या चित्रपटांत वापरलेल्या वस्तू व कपड्यांच्या ...

SHOCKING! Salman Khan, Amir Khan, Madhuri Dixit have all been sold !! | SHOCKING ! ​सलमान खान, आमिर खान, माधुरी दीक्षितचे सगळे काही विकल्या गेले!!

SHOCKING ! ​सलमान खान, आमिर खान, माधुरी दीक्षितचे सगळे काही विकल्या गेले!!

र्षक वाचून धक्का बसला ना. पण आम्ही बोलतोय, ते लिलावाबद्दल. होय, बॉलिवूड सुपरस्टार्सनी आपल्या चित्रपटांत वापरलेल्या वस्तू व कपड्यांच्या लिलावाबद्दल. यापैकी अनेक वस्तू चाहत्यांसाठी लिलाव केल्या गेल्यात. तर काही वस्तू चॅरिटीसाठी लिलावात काढल्या गेल्यात. चित्रपटात सुपरस्टार्सने वापरलेला एखादा ड्रेस किंवा वस्तू अशी काही लोकप्रीय ठरते, की कालांतराने या वस्तू लिलावात काढल्या जातात. कधी आणि कुठल्या वस्तू आत्तापर्यंत लिलावात काढल्या गेल्यात, तेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

बजरंगी लॉकेट



‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटात सलमान खानच्या गळ्यातील बजरंगी लॉकेट चांगलेच लोकप्रीय झाले होते. हनुमान भक्त सलमानने या चित्रपटात घाललेले हे लॉकेट ७१ हजार १५४ रूपयांत विकले गेले.

सलमान खानचा टॉवेल



‘एक बार जो जाए, जवानी फिर ना आए...’ हे गाणे कुणाला आठवत नसेल. या गाण्यात सलमानने जो टॉवेल वापरला होता, त्याचाही लिलाव केला गेला. हा टॉवेल १ लाख ४२ हजारांमध्ये विकला गेला. आहे ना गंमत!

आमिर खानची बॅट



होय, ‘लगान’ चित्रपट तुम्ही पाहिला असेलच. यात आमिर खानने साकारलेल्या भुवनची बॅट आठवते.  भुवनने ज्या बॅटने क्रिकेटची मॅच जिंकली, ती बॅट ६० लाख रूपयांत विकली गेली होती. या बॅटच्या लिलावातून मिळालेली ही रक्कम पाकिस्तानी क्रिकेटर इमरान खान याच्या क्रिकेट हॉस्पीटलसाठी दिली गेली होती.

माधुरी दीक्षितचा हिरवा घागरा



‘देवदास’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटातील ‘मार डाला’ या चित्रपटात माधुरी दीक्षितने हिरव्या गर्द रंगाचा घागरा परिधान केला होता. हा घागरा लिलावात काढला गेला आणि त्याला ३ कोटी रुपए मिळालेत.

प्रियांका चोप्राचे बुट्स



सन २०१३ मध्ये  युनिसेफच्या ‘सेव्ह दी गर्ल्स’ या अभियानासाठी प्रियांका चोप्राने आपल्या उँ१्र२३्रंल्ल छङ्म४ुङ्म४३्रल्ल ऌीी’२ लिलावात काढल्या होत्या. त्या २.५ मध्ये विकल्या गेल्या होत्या.

देव आनंदचे फोटो



अभिनेता देव आनंद आज आपल्यात नाहीत. पण त्यांच्या चित्रपटांनी एकेकाळी प्रेक्षकांना वेड लावले होते. देव आनंद यांचे काही ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट फोटोज होते. या फोटोंवर देव आनंद यांची स्वाक्षरी होती. या फोटोंचा लिलाव केला गेला. हे फोटो ४ लाख रूपयांत विकले गेलेत.

जंगली जॅकेट



सन २०१२ मध्ये झालेल्या ओसियन फॅन आॅक्शनमध्ये आमिर खानने ‘जंगली’या चित्रपटात शम्मी कपूर यांनी परिधान केलेले जॅकेट १.१ लाख रूपयाला विकत घेतले होते. याच चित्रपटात शम्मी कपूर यांनी एक खास स्कार्फ घातला होता. तो १.५६ लाख रूपयांत लिलावात गेला.

धक धक साडी



माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांच्या ‘बेटा’ या चित्रपटातील ‘धक धक करने लगा...’ हे गाणे आठवत असेलच. या लोकप्रीय गाण्यात माधुरी दीक्षितच्या अंगावर पिवळ्या रंगाची साडी दिसते. चॅरिटीसाठी या साडीचाही लिलाव करण्यात आला. ही साडी ८०हजारांत विकली गेली.

उमरावची अंगठी



१९८१ मध्ये आलेला ‘उमराव जान’ हा चित्रपट तुम्हाला आठवत असेलच. या चित्रपटात अभिनेता फारूख यांनी चांदीत मढवलेली निळ्या रंगाचा कुंदन असलेली अंगठी ९६ हजार रूपयांत विकली गेली होती.

 

Web Title: SHOCKING! Salman Khan, Amir Khan, Madhuri Dixit have all been sold !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.