Shocking! सारा अली खानबाबत रिया चक्रवर्तीने केला मोठा खुलासा, वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 11:26 AM2021-06-08T11:26:04+5:302021-06-08T11:26:41+5:30

रिया चक्रवर्तीचे स्टेटमेंट समोर आल्यानंतर साराच्या अडचणीत वाढ झाली होती.

Shocking! Riya Chakraborty's big revelation about Sara Ali Khan, you will be shocked to read | Shocking! सारा अली खानबाबत रिया चक्रवर्तीने केला मोठा खुलासा, वाचून व्हाल हैराण

Shocking! सारा अली खानबाबत रिया चक्रवर्तीने केला मोठा खुलासा, वाचून व्हाल हैराण

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला एक वर्ष पूर्ण होणार आहे. या प्रकरणात ड्रग्स कनेक्शन समोर आले होते. त्यानंतर एनसीबीने तपास सुरू केला होता. एनसीबीने बॉलिवूडच्या कित्येक कलाकारांची ड्रग्स प्रकरणी चौकशी केली होती.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुशांत ड्रग्स प्रकरणातील मुख्य आरोपी रिया चक्रवर्तीने आपल्या कबूलीत सुशांत आणि त्याच्याशी निगडीत कित्येक लोकांबद्दल खुलासे केले होते. सुशांत सिंग राजपूतने मागील वर्षी १४ जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती.


रिया चक्रवर्तीने एनसीबी समोर स्टेटमेंट दिले होते, जे आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिया चक्रवर्तीने आपल्या स्टेटमेंटमध्ये सारा अली खानचेदेखील नाव घेतले होते. तिने आरोप करत म्हटले होते की साराने गांजा आणि व्होडका सादर केले होते.


सुशांत सिंग राजपूत ड्रग्स प्रकरणात एका मीडिया चॅनेलला रियाची चार्जशीट मिळाली होती. ज्यात साराच्या नावाचाही उल्लेख होता. या चार्जशीटमध्ये रियाने म्हटले की, सारा स्वतःच्या हाताने गांज्याची सिगरेट सर्व्ह करत होती. यापूर्वी जेव्हा एनसीबीच्या टीमने बॉलिवूड कलाकारांची चौकशी केली तेव्हा सारा अली खानचे नाव समोर आले होते. मात्र तिची चौकशी केली होती तेव्हा तिने तिच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते. रियाचे म्हणणे आहे की सारा स्वतः त्यांना ड्रग्स ऑफर करत होती.


रिया चक्रवर्तीचे हे स्टेटमेंट समोर आल्यानंतर साराच्या अडचणीत वाढ झाली. मिळालेल्या माहितीनुसार, सारा आणि रिया जिम पार्टनरदेखील होते आणि ते दोघे जिमच्या बाहेर स्पॉट व्हायचे.

Web Title: Shocking! Riya Chakraborty's big revelation about Sara Ali Khan, you will be shocked to read

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.