दंगल गर्ल जायरा वसिमने शेअर केली धक्कादायक पोस्ट; चार वर्षांपासून डिप्रेशनमध्ये असल्याचा केला खुलासा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2018 21:11 IST2018-05-11T15:41:04+5:302018-05-11T21:11:13+5:30

दंगल गर्ल जायरा वसिमने डिप्रेशनमध्ये असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून तिने याबाबतची माहिती दिली आहे.

Shocking post by Rabindranath Tagore; Four years have been revealed in the Depression! | दंगल गर्ल जायरा वसिमने शेअर केली धक्कादायक पोस्ट; चार वर्षांपासून डिप्रेशनमध्ये असल्याचा केला खुलासा !

दंगल गर्ल जायरा वसिमने शेअर केली धक्कादायक पोस्ट; चार वर्षांपासून डिप्रेशनमध्ये असल्याचा केला खुलासा !

ंगल’, ‘सिक्रेट सुपरस्टार’ यासारख्या चित्रपटात आपल्या अभिनयाची चुणूक दाखविणारी अभिनेत्री जायरा वसीम हिने एक धक्कादायक खुलासा केला आहे. सोशल मीडियावर एक भलीमोठी पोस्ट लिहून तिने याबाबतची माहिती दिली आहे. जायराने पोस्टमध्ये लिहिले की, गेल्या चार वर्षांपासून नैराश्याचा सामना करीत असून, डिप्रेशनमध्ये जगत आहे. जायराने ही पोस्ट तिच्या इन्स्टग्राम अकाउंटवर शेअर केली आहे. 

जायराने पोस्टमध्ये लिहिले की, गेल्या चार वर्षांपासून मी अ‍ॅँक्झायटी आणि डिप्रेशनने ग्रस्त आहे. ही बाब मान्य करायला माझ्यात धाडस नव्हते. कारण डिप्रेशन या शब्दाकडे नकारात्मकपणे बघितले जात असल्यानेच मी हे सांगण्यात मी घाबरत होते. त्याहून महत्त्वाचे म्हणजे डिप्रेशन येण्यासाठी तू फारच लहान आहेस किंवा ही तात्पुरती अवस्था असल्याचे मला सांगितले जायचे. ही तात्पुरती अवस्था असू शकली असती, पण या अवस्थेनेच मला नकोशा परिस्थितीत आणून सोडले आहे. दिवसाला अँटिडिप्रेशनच्या पाच गोळ्या, अँक्झायटी अटॅक्स, रात्री-अपरात्री हॉस्पिटलच्या फेºया, रितेपणा, अस्वस्थता, हूरहूर, हॅल्युसिनेशन्स, सूज, अतिझोप किंवा आठवडाभर डोळ्याला डोळा न लागणे, खूप खाणे किंवा भूक उडणे, थकवा, अंगदुखी, स्वत:चा तिटकारा येणे, नर्व्हस ब्रेकडाऊन, आत्महत्येचे विचार... हे सगळे त्या अवस्थेचा भाग होते.

माझ्यासोबत काहीतरी ठीक नाही, हे मला समजत होते. हे डिप्रेशन आहे, असेही कधी वाटायचे. वयाच्या बाराव्या वर्षी मला पहिला पॅनिक अटॅक आला होता. चौदाव्या वर्षी दुसरा.. त्यानंतर तर ते मोजणेच बंद केले. किती औषधे घेतली, याची मोजदादच नाही. कितीवेळा तू डिप्रेशनसाठी खूपच लहान आहेस हे सांगितले गेले, याची गणती नाही. डिप्रेशन असे काही नसतेच, असेही मला सांगितले गेले. जगभरात ३५० मिलियन व्यक्तींना ज्याने ग्रासले आहे, ते डिप्रेशन मलाही आल्याचें मान्य करायला मी तयारच नव्हते. ही भावना नाही, हा आजार आहे. मला डिप्रेशनचे निदान होऊन साडेचार वर्ष लोटली. अखेर मी माझे हे रूप स्वीकारायला तयार झाले. 
 

जायराने पुढे लिहिले की, आता मला सगळ्यांपासून ब्रेक हवा आहे. माझे काम, सोशल लाईफ, शाळा आणि विशेष म्हणजे सोशल मिडीया. मला आशा आहे की येत्या रमझानच्या पवित्र महिन्यात सकारात्मक बदल घडेल. माझ्यासाठी प्रार्थना करा. माझ्या भाविनक चढउतारांमध्ये माझी साथ देणाºया सर्वांना मिठी. इतका संयम ठेवल्याबद्दल माझ्या कुटुंबीयांचे विशेष आभार, असेही जायराने तिच्या पोस्टमध्ये लिहिले. 

दरम्यान, डिप्रेशनला बळी पडलेली जायरा पहिलीच अभिनेत्री नसून, मस्तानी दीपिका पादुकोणलाही याचा सामना करावा लागला आहे. दीपिकानेदेखील डिप्रेशनमध्ये असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. दरम्यान, जायराने अल्पावधितच बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओेळख निर्माण केली आहे. ‘दंगल’ आणि ‘सीके्रट सुपरस्टार’ या चित्रपटातील तिचा अभिनय सर्वच पातळ्यांवर सरस राहिला आहे. त्यामुळे चाहत्यांची संख्याही अफाट आहे. सध्या जायरा १७ वर्षांची असून, इंडस्ट्रीमध्ये तिच्याकडे भविष्यातील मोठी सुपरस्टार म्हणून बघितले जाते. 

Web Title: Shocking post by Rabindranath Tagore; Four years have been revealed in the Depression!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.