`SHOCKING !! ​पायरसीमुळे ‘बाहुबली2’ची कमाई घटली; तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2017 15:31 IST2017-05-08T10:01:27+5:302017-05-08T15:31:27+5:30

‘बाहुबली2’ने बॉक्सआॅफिस कमाईचे सगळे विक्रम तोडले. पण कदाचित पायरसी झाली नसती तर ‘बाहुबली2’ची कमाई यापेक्षा कितीतरी अधिक असती. होय, ...

`SHOCKING !! Poorasi 'Bahubali2' earnings decreased; File complaint | `SHOCKING !! ​पायरसीमुळे ‘बाहुबली2’ची कमाई घटली; तक्रार दाखल

`SHOCKING !! ​पायरसीमुळे ‘बाहुबली2’ची कमाई घटली; तक्रार दाखल

ाहुबली2’ने बॉक्सआॅफिस कमाईचे सगळे विक्रम तोडले. पण कदाचित पायरसी झाली नसती तर ‘बाहुबली2’ची कमाई यापेक्षा कितीतरी अधिक असती. होय, पायरसीमुळे ‘बाहुबली2’च्या निर्मात्यांना खूप मोठे नुकसान झाल्याचा दावा तमिळ चित्रपट निर्माता संघटनेच्या सदस्यांनी केला आहे. ‘बाहुबली2’च्या निर्मात्यांनीच स्वत: तमिळ चित्रपट निर्माता संघटनेकडे पायरसीविषयी तक्रार केली होती. त्याची गंभीर दखल घेत, तमिळ चित्रपट निमार्ता संघटनेचा नवनियुक्त अध्यक्ष आणि अभिनेता विशाल याने तमिळ रॉकर्स या पायरसी वेबसाईटविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या वेबसाईटने दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या ‘बाहुबली2’अर्थात ‘बाहुबली द कन्क्लुजन’ चित्रपटाची पायरेटेड कॉपी इतरही काही वेबसाईटवर अपलोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. निर्माता संघटनेच्या प्रतिनिधींनी रविवारी शहर पोलीस आयुक्त करण सिंघ यांची भेट घेतली. तमिळ रॉकर्स या नावाने पायरसी करणाºया इंटरनेट माफियांविरोधात लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी या संघटनेने केली आहे.

ALSO READ : बाहुबली प्रभासच्या पहिल्या बॉलिवूडपटात दिसू शकतील या पाच अभिनेत्री!!

  पायरेटेड व्हर्जन दाखविणाºया वेबसाईटचे अधिकार काढून घ्यावेत आणि त्यामागे असणाºया व्यक्तींना तुरुंगात टाकावे, अशी मागणीदेखील सदस्यांनी केली आहे. या संघटनेने ‘बाहुबली2’ बेकायदेशीरपणे डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेबसाईट्सच्या आयपी अ‍ॅड्रेसचा शोध घेतल्याचेही तक्रारीत म्हटलेय. इंटरनेट पायरसीसोबतच  चित्रपटांनातमिळनाडूनमध्येही टीव्ही पायरसीचा सामना करावा लागत आहे. याच कारणामुळे जवळपास ३०० चित्रपटांचे सेटलाइट अधिकार अद्याप कोणीही विकत घेतलेले नाहीत. यामध्ये रजनीकांत यांचा ‘कबाली’आणि ‘थेरी’ यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचाही समावेश आहे. आता पोलिस या प्रकरणाच्या किती खोलात जातात, ते आपण बघुयात. पायरसीबद्दलची तुमची मते, आम्हाला कळवायला विसरू नका. खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला तुमची मते कळवू शकता.

Web Title: `SHOCKING !! Poorasi 'Bahubali2' earnings decreased; File complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.