Shocking : परिणिती चोपडाने म्हटले, मुले माझा स्कर्ट वर करण्याचा प्रयत्न करायचे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2017 15:18 IST2017-05-23T09:24:57+5:302017-05-23T15:18:10+5:30
अभिनेत्री परिणिती चोपडा नुकतीच मुंबई येथील ‘वुमन सेल्फ डिफेंस ग्रॅज्युएशन डे’ कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी तिने तिच्या लहानपणीच्या ...

Shocking : परिणिती चोपडाने म्हटले, मुले माझा स्कर्ट वर करण्याचा प्रयत्न करायचे!
अ िनेत्री परिणिती चोपडा नुकतीच मुंबई येथील ‘वुमन सेल्फ डिफेंस ग्रॅज्युएशन डे’ कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी तिने तिच्या लहानपणीच्या आठवणी शेअर करताना, शालेय जीवनात मुले तिची कशी छेड काढायचे याविषयी सांगितले. परिणितीने म्हटले की, माझ्या वडिलांकडे कार खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याने मला दररोज सायकलवरच शाळेत जावे लागत असे. मुलांनी माझी छेड काढू नये म्हणून माझे वडील काही अंतरापर्यंत माझ्यासोबत येत असत. परंतु शाळेजवळ येताच जमलेले टोळके माझी छेड काढायचे. मला त्रास द्यायचे. काही मुले तर माझा स्कर्ट वर करण्याचा प्रयत्न करीत असत.
परिणितीने पुढे बोलताना म्हटले की, हा दररोजचा जाच झाल्याने मला माझ्या आई-वडिलांचा प्रचंड तिरस्कार वाटायला लागला. मी त्यांना जेव्हा-जेव्हा विचारायचे की, मला तुम्ही सायकलवर शाळेत का जायला सांगता, तेव्हा त्यांचे एकच उत्तर असायचे की, आम्हाला तुला स्ट्रॉन्ग बनवायचे आहे. या कार्यक्रमात अभिनेता अक्षयकुमारही परिणितीबरोबर उपस्थित होता. यावेळी परिणितीने अक्षयचे कौतुक करताना म्हटले की, मला आनंद होत आहे की, अक्षय सर तुम्हाला सेल्फ डिफेंस शिकविण्यासाठी कुठल्याही प्रकारचे मानधन घेणार नाही. शिवाय याकरिता तुम्हाला कुठल्याही प्रकारची वर्दी परिधान करण्याची गरज नसल्याचे परिणितीने सांगितले.
![]()
त्याचबरोबर परिणितीने असेही म्हटले की, तुमच्याकडे त्या सर्व सुविधा आहेत, ज्या माझ्याकडे नाहीत. मी प्रार्थना करते की, तुमच्यावर कधीच, कुठल्याही अनुचित घटनेचा सामना करण्याची वेळ उद्भवू नये. जर अशी वेळ उद्भवलीच तर समोरच्याच्या तोंडावर एक पंच मारा असा सल्लाही तिने दिला. सध्या परिणिती रोहित शेट्टी याच्या ‘गोलमाल अगेन’ या चित्रपटात लीड रोल करताना बघावयास मिळत आहे. अजय देवगण स्टारर हा चित्रपट फुल टू कॉमेडी आहे. याशिवाय परिणितीचा ‘मेरी प्यारी बिंदू’ हा चित्रपट नुकताच रिलीज झाला असून, त्यामध्ये परिणितीच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक केले गेले.