Shocking !! ​‘या’ दीपिकाला तुम्ही ओळखू शकाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2016 14:55 IST2016-11-10T12:14:50+5:302016-11-10T14:55:12+5:30

दीपिका पादुकोण सध्या संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या शूटींगधमध्ये व्यस्त आहे. काल परवाच दीपिका एका आंतरराष्ट्रीय अवार्ड ...

Shocking !! Can you identify 'this' Deepika? | Shocking !! ​‘या’ दीपिकाला तुम्ही ओळखू शकाल?

Shocking !! ​‘या’ दीपिकाला तुम्ही ओळखू शकाल?

पिका पादुकोण सध्या संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या शूटींगधमध्ये व्यस्त आहे. काल परवाच दीपिका एका आंतरराष्ट्रीय अवार्ड शोच्या रेड कार्पेटवर दिसली आणि आज एका झोपडपट्टीत राहणाºया मुलीच्या वेशात. आश्चर्य वाटते ना. पण हे खरे आहे. दीपिकाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यात चेहºयावर जराही मेकअप नसलेली सलवार सूट घातलेली दीपिका दिसते आहे. हे फोटो पाहिल्यानंतर ही दीपिकाच आहे, यावर क्षणभर विश्वासच होत नाही. पण फोटोतील मुलगी दीपिकाच आहे. होय, हे फोटो म्हणजे दीपिकाच्या आगामी चित्रपटातील नवा लूक आहे. ‘पद्मावती’शिवाय दीपिकाने आणखी एका चित्रपटासाठीही होकार दिला आहे. हा चित्रपट आहे इराणी फिल्ममेकर माजिद मजीदी यांचा.  या चित्रपटातील दीपिकाचा लूक आज जारी करण्यात आला. तिचा हा लूक सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का देणारा आहे. मजीदींच्या चित्रपटातील दीपिकाचा हा नवा लूक पाहता, ती यात झोपडपट्टीत राहणाºया कुण्या एका मुलीची भूमिका साकारणार असल्याचा अंदाज येतो. सलमावर सूट आणि विना मेकअपमधील ही मुलगी दीपिकाच आहे, यावर क्षणभर विश्वास ठेवणे कठीण होते. हा चित्रपट मजीदींचा ड्रिम प्रोजेक्ट असल्याचे कळतेय आणि यात दीपिका लीड रोलमध्ये दिसणार आहे. हनी त्रेहन चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. हा चित्रपट भारतीय नातेसंबंध आणि भाव-भावनांवर आधारित आहे. मुंबई, दिल्ली, उत्तरप्रदेश, राजस्थान आणि काश्मिरात या चित्रपटाचे शूटींग होणार आहे. निश्चितपणे दीपिकाला कधी नव्हे ते या अवतारात पाहणे प्रेक्षकांसाठी आगळा-वेगळा अनुभव राहणार आहे.  



माजिद मजीदी हे आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले इराणी चित्रपटदिग्दर्शक, चित्रपटनिमार्ते आणि पटकथाकार आहेत. माजिदीच्या वैविध्यपूर्ण चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.


 

Web Title: Shocking !! Can you identify 'this' Deepika?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.