Shocking - अरबाज खानने दिली आयपीएलमध्ये सट्टा लावल्याची कबुली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2018 15:41 IST2018-06-02T10:07:46+5:302018-06-02T15:41:20+5:30
आयपीएल सामन्यांवरील बेटिंग प्रकरणात शुक्रवारी ठाणे खंडणीविरोधी पथकाने सुपरस्टार सलमान खानचा भाऊ अभिनेता अरबाज खानला समन्स बजावला होता. बेटिंग ...

Shocking - अरबाज खानने दिली आयपीएलमध्ये सट्टा लावल्याची कबुली
आ पीएल सामन्यांवरील बेटिंग प्रकरणात शुक्रवारी ठाणे खंडणीविरोधी पथकाने सुपरस्टार सलमान खानचा भाऊ अभिनेता अरबाज खानला समन्स बजावला होता. बेटिंग प्रकरणात अरबाज खानची चौकशी करण्यात आली यावेळी त्यांने सट्टा लावल्याची कबुली दिली आहे.
ठाणे खंडणीविरोधी पथकाने काही दिवसांपूर्वी आयपीएल सामन्यांवर सुरु असलेल्या आॅनलाइन बेटिंगचे रॅकेट उघड करताना डोंबिवलीतून तिघांना अटक केली होती. त्यानंतर या तिघांच्या चौकशीत हे रॅकेट देशातला आघाडीचा बुकी सोनू जालान उर्फ सोनू मालाड हा चालवत असल्याचे समोर आले होते. पोलिसांनी सोनूवर कारवाई करताना त्याला बेड्या ठोकल्या होत्या. पोलिसांनी सोनूची अधिक चौकशी केली असता, त्याच्याकडे अरबाजही बेटिंग करीत असल्याची माहिती समोर आली.
सोनूकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अरबाजने क्रिकेटच्या अनेक सामन्यांवर त्याच्याकडे सट्टा लावला होता. आतापर्यंत दोन कोटी ८० लाखांचा सट्टा तो हरला आहे. काही दिवस त्याने सूनला पैसे दिले ही. मात्र, काही रक्कम त्याने दिलीच नाही. राहिलेली रक्कम मागण्यासाठी सोनूने अरबाजकडे तगादा लावला होता. सोशल मीडियावर अरबाजचे सोनूसोबतचे फोटोही व्हायरल झाले होते. अरबाजच्या आधी अभिनेता विंदु दारा सिंगदेखील सोनूला पहिल्या आयपीएल सीझन दरम्यान भेटला होता. या प्रकरणातील मुख्य संशयित असलेल्या सोनूच्या संपर्कात देशातले ८० ते ९० बडे बुकी आणि अनेक सेलिब्रेटी असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे लवकरच खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात बड्या आसामींची हजेरी लागण्याची शक्यता आहे.
अरबाज आणि मलायकाचे लग्न तुटल्याचे सट्टेबाजी हे सुद्धा एक कारण असल्याचे समजते आहे. अरबाज बेटींग करत असल्यामुळे अनेक वेळा त्याचे आणि मलायकाचे खटके उडायचे. तसेच सलमानसुद्धा अरबाजच्या यासवयीमुळे त्याच्यावर नाराज होता.