Shocking : ​...अन् फोनवर बोलता बोलता अबु सालेमच्या प्रेमात पडली ही अभिनेत्री !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2017 17:59 IST2017-06-16T12:29:56+5:302017-06-16T17:59:56+5:30

1993 मध्ये झालेल्या मुंबईतील बॉम्बस्फोटाचा आज निकाल जाहीर झाला. आणि अशातच पुन्हा एकदा मोनिका बेदीची चर्चा झाली. जेव्हा जेव्हा ...

Shocking: ... and actress Abhay Salem fell in love with the phone! | Shocking : ​...अन् फोनवर बोलता बोलता अबु सालेमच्या प्रेमात पडली ही अभिनेत्री !

Shocking : ​...अन् फोनवर बोलता बोलता अबु सालेमच्या प्रेमात पडली ही अभिनेत्री !

1993
मध्ये झालेल्या मुंबईतील बॉम्बस्फोटाचा आज निकाल जाहीर झाला. आणि अशातच पुन्हा एकदा मोनिका बेदीची चर्चा झाली. जेव्हा जेव्हा अबु सालेमचं नाव येतं तेव्हा तेव्हा मोनिका बेदीची आठवण होतेच. 
याला कारणही देखील तसंच आहे. ते म्हणजे दोघांचे प्रेमसंबंध. चला जाणून घ्या, चित्रपटसृष्टीपासून लांब असलेली मोनिका बेदी जेलमध्ये असलेल्या अबु सालेमच्या कशी जवळ गेली.
फिल्मफेअर डॉट कॉम आणि इंडिया फॉरम्स डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार मोनिकाने स्वत: तिच्या आणि अबु सालेमच्या लव्हस्टोरीवर चर्चा केली आहे. मोनिका बेदी एक अभिनेत्री आहे. त्यामुळे स्टेज शोच्या कार्यक्रमात तिला अधिक रस होता. मोनिकाच्या माहितीनुसार तिने अंडरवर्ल्ड सरगना दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांची नाव तर ऐकली होती. पण अबु सालमेचं नाव तिला माहित नव्हतं. 1998 मध्ये मोनिका पहिल्यांदा फोनवर अबु सालेमशी बोलली. मोनिका दुबईमध्ये होती. तिला दुबईत एका स्टेश शोची आॅफर मिळाली होती. स्टेज शोच्या दरम्यान अबुने स्वत:ला एक बिझनेसमन म्हणून सांगितलं होतं. मात्र अबु सालेमचा बोलण्याचा अंदाज तिला अधिक भावला. मोनिका आणि अबु यांच्यात सतत फोनवरून संपर्क व्हायचा. पण मला कायम वाटायचं की आमच्यात काही ना काही संपर्क आहे.
मोनिका सांगते की, मला कधीच वाटलं नव्हतं की मी कुणाशी फोनवर बोलून अशी प्रेमात पडली असेन. फोनवर बोलता बोलता तेच कळलं नाही. पण अस नाही की प्रेमात पडली पण मला तो आवडायला लागला होता हे नक्की. एवढंच नाही तर दिवसभर मी त्याच्या फोनची वाट पाहत असायची. आणि फोन आला नाही तर व्याकूळ व्हायची. फोनवर बोलताना मला तो कायमच भला माणूस वाटत असे.
अबु सालेमसोबत बोलताना कायम असं वाटायचं की तो खूप चांगला क्लोज फ्रेंड आहे. मी त्याच्याशी फोनवर सगळ्या गोष्टी शेअर करायचे. दुबईच्या शोनंतर आम्ही इतके जवळ आलो की प्रत्येक अध्यार्तासाने अबू मला फोन करायचा. दुबईत दोन वेळा भेटल्यानंतर मी पुन्हा मुंबईत आले. मी अबुला मुंबईत देखील यायला सांगितलं पण तो कायम काही ना काही कारण देऊन विषय टाळत असे. 

Source : india.com

Web Title: Shocking: ... and actress Abhay Salem fell in love with the phone!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.