शिल्पा शिंदेच्या ‘लाइन मारो’ अंदाजावर चाहते नाखूश; म्हटले ‘ओन्ली चरबी है’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 20:02 IST2017-09-08T14:32:32+5:302017-09-08T20:02:32+5:30

‘भाबी जी घर पर है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली शिल्पा शिंदेचा नुकताच एक आयटम नंबर रिलीज झाला. परंतु प्रेक्षकांना तो फारसा भावला नाही.

Shilpa Shinde's 'Line Shoot' unhappy with the idea; The saying is 'only fat is' !! | शिल्पा शिंदेच्या ‘लाइन मारो’ अंदाजावर चाहते नाखूश; म्हटले ‘ओन्ली चरबी है’!!

शिल्पा शिंदेच्या ‘लाइन मारो’ अंदाजावर चाहते नाखूश; म्हटले ‘ओन्ली चरबी है’!!

ाबी जी घर पर है’ या टीव्ही शोमध्ये ‘अंगुरी भाभी’ची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेल्या शिल्पा शिंदेचे एक आयटम सॉँग नुकतेच रिलीज झाले. ‘पटेल की पंजाबी शादी’ या चित्रपटातील ‘मारो लाइन’ या गाण्यावर शिल्पा थिरकताना दिसते. परंतु प्रेक्षकांना तिचा हा बदललेला अंदाज फारसा भावलेला दिसत नाही. एक तर शिल्पा या गाण्यात प्रचंड फॅट दिसत आहे. शिवाय तिचे ठुमकेही फारसे पटणारे नाहीत. त्यामुळेच शिल्पाच्या या पहिल्यावहिल्या आयटम नंबरला चाहत्यांकडून नापसंत केले जात आहे. विशेष म्हणजे यू-ट्यूबवर शिल्पाच्या या गाण्यातील डान्सवर चर्चा रंगत आहे. बºयाच यूजर्सनी तिला वजन कमी करण्याचा सल्लाही दिला आहे. 



एका यूजरने व्हिडीओ शेअर करताना शिल्पाला म्हटले की, ‘ओन्ली चरबी है’ तर काही शिल्पाच्या डान्सचे कौतुकही करीत आहेत. विश्वजित नावाच्या एका यूजरने कॉमेण्ट करताना लिहिले की, ‘नाइस सॉँग अ‍ॅण्ड शिल्पा इज लूकिंग नाइस.’ दरम्यान, शिल्पाने या गाण्यात गोल्डन शिमरी ड्रेस परिधान केलेला आहे. गाण्यात शिल्पाबरोबर बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते ऋषी कपूरही ठुमके लावताना दिसत आहेत. ‘भाबी जी घर पर है’ या मालिकेत अतिशय पारंपारिक अवतारात झळकलेली शिल्पा अचानकच अशा अंदाजात बघावयास मिळाल्याने लोकांना तिला पसंत करणे थोडेसे अवघड होत असल्याचेच दिसून येत आहे. 



कारण गोल्डन रंगाचा शॉर्ट ड्रेस आणि सिड्यूसिव्ह डान्स शिल्पावर फारसा भावत नाही. असो, शिल्पा शिंदे बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार असल्याच्या कारणांवरून मध्यंतरी चर्चेत आली होती. परंतु तिने शोमध्ये सहभागी होण्यास नकार दिल्याचे समजते. त्याचबरोबर शिल्पा ‘भाबी जी घर पर हैं’ या मालिकेमुळे जेवढी प्रसिद्ध झाली तेवढीच वादग्रस्तही ठरली आहे. कारण शिल्पाने मालिकेच्या निर्मात्यांवर त्यावेळी अनेक आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. त्यामुळे शिल्पाला मालिकेतून घरचा रस्ता दाखविण्यात आला. 

Web Title: Shilpa Shinde's 'Line Shoot' unhappy with the idea; The saying is 'only fat is' !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.