भक्ती की पीआर स्टंट? धीरेंद्र शास्त्रीसोबत वृंदावन पदयात्रेत सहभागी झाल्यामुळे शिल्पा शेट्टी ट्रोल, राज कुंद्रा म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 11:05 IST2025-11-21T11:04:11+5:302025-11-21T11:05:09+5:30
शिल्पा शेट्टीने अलीकडेच धीरेंद्र शास्त्री यांच्या नेतृत्वाखालील एका 'सनातन हिंदू एकता' पदयात्रेत भाग घेतला होता.

भक्ती की पीआर स्टंट? धीरेंद्र शास्त्रीसोबत वृंदावन पदयात्रेत सहभागी झाल्यामुळे शिल्पा शेट्टी ट्रोल, राज कुंद्रा म्हणाला...
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा हे कायदेशीर आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. अलीकडेच शिल्पा शेट्टी एका आध्यात्मिक पदयात्रेत सहभागी झाली होती. ज्यावरून सोशल मीडियावर तिच्यावर जोरदार टीका झाली. 'स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी तिने हे पाऊल उचलले' अशी टीका नेटकऱ्यांनी केली. मात्र, टीका होताच संतप्त झालेल्या राज कुंद्राने एका टीकाकाराला जशास तसे उत्तर दिले. यामुळे हा वाद पुन्हा एकदा चांगलाच पेटला आहे.
शिल्पा शेट्टीने अलीकडेच धीरेंद्र शास्त्री यांच्या नेतृत्वाखालील एका 'सनातन हिंदू एकता' पदयात्रेत भाग घेतला होता. या पदयात्रेत शिल्पा शेट्टीसह राजपाल यादव, एकता कपूर आणि शिखर धवन यांसारखे अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. नेटकऱ्यांनी या सेलिब्रिटींचे फोटो शेअर करत त्यांच्यावर कायदेशीर खटले सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित केला आणि टीका केली.
एका नेटकऱ्याने लिहिले, "दिल्ली ते वृंदावन या पदयात्रेत राजपाल यादव, शिल्पा शेट्टी आणि एकता कपूर धीरेंद्र शास्त्री यांच्यासोबत होते. शिल्पा शेट्टीवर एका व्यावसायिकाची ६० कोटींपेक्षा जास्त फसवणूक केल्याचा आरोप आहे. तिचा पती पॉर्न चित्रपट बनवतो. राजपाल यादववर प्रामुख्याने चेक बाऊन्सिंग आणि कर्ज बुडवल्याचा आरोप आहे. कायद्यांना तोंड देणारे सेलिब्रिटी आता बाबांचा आश्रय घेत आहेत. त्यांचे मुख्य कारण म्हणजे सनातन हिंदू एकता पदयात्रेदरम्यान धीरेंद्र शास्त्रींच्या समर्थनार्थ आलेल्या भक्तांचा ओघ. लवकरच, बाबांच्या माध्यमातून त्यांची सर्व पापे माफ केली जातील".
राज कुंद्राचं सडेतोड उत्तर
या टीकेमुळे संतप्त झालेल्या राज कुंद्राने लगेच सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली. राज कुंद्रा म्हणाला, "जे लोक समजुतीच्या अंधारात राहतात, ते नेहमीच मोठ्याने ओरडताल. पण साधे सत्य हे आहे की, आरोप म्हणजे दोषसिद्धी नाही आणि हेडलाईन्स म्हणजे न्यायनिवाडा नाही. काही लोकांना श्रद्धेत शांतता मिळते, तर काहींना ट्रोलिंग करत गोंधळ माजवण्यात मजा येते. जर तुम्हाला सनातन धर्मासाठी उभं राहणं, भक्ती दाखवणं किंवा अध्यात्मिक गोष्टींना पाठिंबा देणं इतकं जास्त खटकत असेल, तर कदाचित समस्या आमच्यात नाही… तर तुमच्या मनातील कडवटपणात आहे. कायदा त्याचं काम करेल, सत्य योग्य वेळी समोर येईल. पण तुम्ही ट्रोल करणारे नकारात्मक टीका तात्पुरता आनंद मिळवत राहा, वाहेगुरू".
People who live in the darkness of assumptions will always shout the loudest.
— Raj Kundra (@onlyrajkundra) November 20, 2025
But here’s a simple truth allegations are not convictions, and headlines are not judgments. Some people seek peace in faith. Some seek noise in trolling. If standing for Sanatan, showing devotion, or… https://t.co/k3EFT9BQBR
नेमका फसवणुकीचा खटला काय आहे?
शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरोधात ६० कोटींच्या फसवणुकीचा खटला सध्या न्यायालयात सुरू आहे. लोटस कॅपिटल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे संचालक आणि व्यापारी दीपक कोठारी यांनी त्यांच्याविरुद्ध ही तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, शिल्पा आणि राज यांनी त्यांच्याकडून व्यवसाय वाढवण्याच्या बहाण्याने पैसे घेतले, परंतु ते पैसे वैयक्तिक खर्चासाठी वापरले असल्याचा आरोप आहे.