शिल्पा शेट्टी, राज कुंद्राला न्यायालयाचा फटका; लिहून घेतले शपथपत्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2017 15:40 IST2017-05-20T10:10:09+5:302017-05-20T15:40:09+5:30

अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आॅनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून ...

Shilpa Shetty, Raj Kundra to be shot dead; Affidavit written! | शिल्पा शेट्टी, राज कुंद्राला न्यायालयाचा फटका; लिहून घेतले शपथपत्र!

शिल्पा शेट्टी, राज कुंद्राला न्यायालयाचा फटका; लिहून घेतले शपथपत्र!

िनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. आॅनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून एका निर्यात कंपनीच्या मालकाला २४ लाख रुपयांना गंडा घालून फसवणूक केल्याच्या आरोपप्रकरणी ठाणे न्यायालयाने शिल्पा आणि तिच्या पतीसह अन्य तिघांकडून शपथपत्र लिहून घेण्याचे आदेश दिले आहेत. या शपथपत्रावर या तिघांकडून असे लिहून घेण्यात येणार आहे की, ते संबंधित कंपनीच्या मालकाला धमकावण्याचा प्रयत्न करणार नाहीत. 

कंपनीचे मालक रवि भलोटिया यांच्या वकिलांनी आरोप लावला की, राज कुंद्राने त्यांच्या पक्षकारास न्यायालयाच्या आवारात धमकाविले आहे. त्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश संगीता खालिपे यांनी या प्रकरणातील पाचही संशयितांकडून शपथपत्र लिहून घेण्याचे आदेश दिले आहेत. वकिलांनी केलेल्या तक्रारीनुसार कुंद्रा याने प्रकरणाची सुनावणी होण्याअगोदरच रवि भालेरीया यांना धमकविताना तुझ्याकडून शंभर कोटी रुपये वसूल करणार असल्याचे म्हटले होते. 

काही दिवसांपूर्वीच रवि भालेरीया यांनी शिल्पा आणि तिच्या पतीवर २४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर शिल्पा आणि तिच्या पतीने संबंधित व्यावसायिकाला शंभर कोटी रुपयांच्या मानहानीची नोटीस बजावली होती. 

याबाबतचे प्रकरण असे की, बेस्ट डील टीव्ही कंपनीच्या माध्यमातून विविध कंपनीच्या प्रोडक्ट विक्र ीचा आॅनलाइन शॉपिंगचा व्यवसाय उद्योगपती राज कुंद्रा यांनी पत्नी शिल्पा शेट्टीच्या नावाने सुरू केला होता. व्यवसायात नफा व्हावा, यासाठी रवि मोहनलाल भालेरीया या व्यापाºयाने बेस्ट डील टीव्ही कंपनीमार्फत ५ कोटी रु पयांच्या बेडशीटची आॅर्डर घेतली होती. या व्यवहारात २३ लाख रु पयांची फसवणूक झाली आहे, असा आरोप भालेरीया यांनी केला होता. याप्रकरणी शिल्पा शेट्टी, तिचा पती राज कुंद्रा, दर्शित शाह, उदय कोठारी, वेदांत विकास बल्ली यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

राज कुंद्रा सीईओ असलेल्या ही कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने अनेक कर्मचाºयांचा पगार देण्यात आला नव्हता. त्याचबरोबर अनेक वेंडर्सचेही पेमेंट केले गेले नाही. त्याच कारणाने अनेकांनी राज व शिल्पा यांच्याविरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. 

Web Title: Shilpa Shetty, Raj Kundra to be shot dead; Affidavit written!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.