मुद्द्याचं बोलला जान्हवीचा बॉयफ्रेंड, शिखर पाहारियाची रोखठोक पोस्ट, पाकिस्तानला ठणकावत म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 18:49 IST2025-05-08T18:37:38+5:302025-05-08T18:49:20+5:30

शिखर पाहारियाची रोखठोक पोस्ट, मांडले महत्त्वाचे मुद्दे!

Shikhar Pahariya's Reaction Pahalgam Attack And Operation Sindoor Pakistan Terrorism | मुद्द्याचं बोलला जान्हवीचा बॉयफ्रेंड, शिखर पाहारियाची रोखठोक पोस्ट, पाकिस्तानला ठणकावत म्हणाला...

मुद्द्याचं बोलला जान्हवीचा बॉयफ्रेंड, शिखर पाहारियाची रोखठोक पोस्ट, पाकिस्तानला ठणकावत म्हणाला...

Shikhar Pahariya: भारत आणि पाकिस्तानातील तणाव शिगेला पोहोचला आहे. पहलगाम हल्ल्याचा बदला घेत भारताने दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करत 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) मोहिम फत्ते केली. यानंतर चवताळलेल्या पाकिस्तानने ७ आणि ८ मे २०२५ च्या रात्री अमृतसर, अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, जालंधर, भुज, आदमपूर, भटिंडा, लुधियानामधील भारतीय लष्कराच्या तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय सैन्याने पाकिस्तानचा हा प्रयत्न हाणून पाडला. भारताने पाकिस्तानच्या हवाई संरक्षण यंत्रणेवर हल्ला करून ती यंत्रणा उद्ध्वस्त केली आहे. यानंतर आता अनेकांनी लष्कराच्या या शौर्याचं कौतुक केलं आहे. भारतीय कलाकार मोहिमेबाबत आनंद व्यक्त करत आहेत. भारताच्या या ठोस कारवाईवर जगभरात चर्चा रंगली आहे. पण, यातच पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे काहींनी मागितले आहेत. भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानात लोक मारले गेलेत, याचा आनंद व्यक्त करणं अत्यंत वाईट असल्याचं काही म्हटलंय. यावर शिखर पाहारियानं रोखठोक पोस्ट शेअर केली आहे.

शिखर पाहारियानं एक स्पष्ट, ठाम आणि भावनिक पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहलं, "मला निर्दयी म्हणाऱ्या त्या सर्वांसाठी ही पोस्ट आहे, जे मला भारतीय सशस्त्र दलांचे कौतुक केल्यानंतर  किंवा पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे "पुरावे" मागत आहेत. मला त्यांना रागाच्या भरात नाही तर तथ्यांसह उत्तर द्यायचं आहे. तर पहलगाम ही काही लष्करी चौकी नव्हती. ते एक शांत पर्यटन स्थळ होतं. जिथे कुटुंबे मृत्यूला सामोरे जाण्यासाठी नाही तर थोडा आनंद मिळवण्यासाठी आली होती. तरीही २६ निष्पाप भारतीयांचा जीव क्रूरपणे घेण्यात आला.  त्याच्याकडे कोणतेही शस्त्रे नाहीत. तो एक द्वेषाने भरलेला नरसंहार होता".

शिखरनं या पोस्टमध्ये काही तथ्य मांडतं पुढे लिहलं, "पर्यटकांवरील हा हल्ला लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदने घडवून आणला. त्यांना पाकिस्तानच्या आयएसआयने पाठिंबा दिला. त्यात दोन दहशतवादी पाकिस्तानी नागरिक होते, त्यातील एक माजी निमलष्करी अधिकारी होता. भारताच्या प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानने जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरभोवती सुरक्षा वाढवली. जो संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेला जागतिक दहशतवादी आहे. तो आजही बहावलपूरमध्ये आयएसआय आणि पाकिस्तानी सैन्याच्या संरक्षणाखाली मुक्तपणे फिरतो. पाकिस्तानने दहशतवादाचा निषेध केला नाही तर त्यांचे रक्षण केलं".

शिखरने पाकिस्तानमध्ये झालेल्या दहशतवादी कारवायांबद्दल (Shikhar Pahariya on Pakistan Terrorism) एकामागून एक पुरावेही दिले. त्यानं लिहलं,  "हे विसरू नका की ओसामा बिन लादेन अबोटाबादमधील लष्करी तळाजवळ सापडला होता. हाफिज सईदने राज्य संरक्षणाखाली द्वेषपूर्ण रॅलींचे नेतृत्व केलं होतं. संयुक्त राष्ट्र आणि FATF ने वारंवार इशारा दिल्यानंतरही पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनलंय. हा द्वेष नाही, आमचं हृदय तुटलंय. आईला रडताना पाहिल्याचं, मुले अनाथ झाल्याचं आणि शांतता पुन्हा पुन्हा भंग पावताना पाहण्याचे हे दुःख आहे.  हे घडवूण आणणारे गणवेश घालतात आणि खोट्या अभिमानात फुशारकीने झेंडे फडकवतात".


शेवटी, शिखर पाहारिया याने पाकिस्तानातील सामान्य जनतेप्रती सहवेदना व्यक्त केली.  तो म्हणाला, "शांत, निष्पाप आणि दिशाभूल झालेल्या पाकिस्तानच्या लोकांबद्दल मला सहानुभूती आहे. पण आमचा  राग चुकीचा नाही. तो पाकिस्तानच्या सामान्य लोकांप्रती नाही तर द्वेषाने नेतृत्व करणाऱ्या आणि नीतिमत्त्वापासून दूर अजेंडे ठेवणाऱ्या, लोभी, अराजक लोकांप्रती आहे. ते आमची शांती भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. खरं तर त्यांनी तुम्हाला आधीचं लुटलंय.  तुमची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे.  शोकांतिका ही आहे की ते तुम्हाला कळतही नाही आणि हे दुर्देवी आहे. पण, भारत कधीच विसरत नाही, भारत उठतो आणि  भारत उत्तर देतो. भारतानं खूप काळ "मोठं मन" आणि "संयम" दाखवलायं. पण, जेव्हा दहशतवाद स्वतःला शक्ती म्हणवून घेतोय, तेव्हा आम्ही गप्प राहणार नाही.  आमचं रक्त सांडून तुम्ही वारंवार हात वर करुन ते झाकू शकत नाही. आता तर मुळीचं नाही. जय हिंद", या शब्दात शिखर पाहारियानं पाकिस्तानी लोकांना सुनावलं आहे. दरम्यान, शिखर पाहारिया हा  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू तर अभिनेत्री जान्हवी कपूर हिचा बॉयफ्रेंड आहे. दोघेही लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे. 

Web Title: Shikhar Pahariya's Reaction Pahalgam Attack And Operation Sindoor Pakistan Terrorism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.