Raj Kundra Case :  नशीब समज या स्कँडलमध्ये फसली नाहीस..., राखी सावंतवर शर्लिन चोप्रा भडकली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 11:31 AM2021-08-08T11:31:12+5:302021-08-08T11:36:02+5:30

शुक्रवारी मुंबई क्राईम ब्रँचने अभिनेत्री शर्लिन चोप्राची तब्बल 8 तास चौकशी केली. यानंतर शर्लिन मीडियाशी बोलली आणि यादरम्यान शर्लिननं राखी सावंतला सुनावलं.

sherlyn chopra slams rakhi sawant for taking raj kundra side in pornography-case | Raj Kundra Case :  नशीब समज या स्कँडलमध्ये फसली नाहीस..., राखी सावंतवर शर्लिन चोप्रा भडकली

Raj Kundra Case :  नशीब समज या स्कँडलमध्ये फसली नाहीस..., राखी सावंतवर शर्लिन चोप्रा भडकली

googlenewsNext
ठळक मुद्देअभिनेत्री राखी सावंतने राज कुंद्रा प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली होती.

शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याला पोर्नोग्राफी प्रकरणात  (Raj Kundra Pornography)अटक झाली. अद्यापही कुंद्रा तुरूंगात आहे. दरम्यान आता या प्रकरणात अनेकांची नावं पुढे येत आहेत. शुक्रवारी मुंबई क्राईम ब्रँचने अभिनेत्री शर्लिन चोप्राची (Sherlyn Chopra) चौकशी केली. तब्बल 8 तास तिला चौकशीला सामोरं जावं लागलं.  यानंतर शर्लिन मीडियाशी बोलली आणि यादरम्यान शर्लिननं राखी सावंतलाही (Rakhi Sawaant) जोरदार सुनावलं.
 आता शर्लिन राखी सावंतवर का भडकली तर पोर्नोग्राफी प्रकरणासंदर्भात राखी सावंतनं केलेलं एक व्यक्तव्य. होय, जसं विकाल तशीच ऑफर मिळणार, असं राखी सावंत म्हणाली होती. तिचा इशारा राज कुंद्राकडून ऑफर मिळाल्याचा दावा करणा-या अभिनेत्रींकडे होता.
राखीच्या नेमक्या याच वक्तव्यामुळे शर्लिन चांगलीच भडकली. तिनं तिच्यावर जबरदस्त भडास काढली.

या प्रकरणावर बोलण्याचा राखीला काहीही अधिकार नाही, असं शर्लिननं सुनावलं.  ‘राखी सावंत तू एक चांगली डान्सर आहेस, कलाकार आहे, कॉमेडियन आहे, लोकप्रिय आहेत. तुझी मिरची पार्टी चालली नाही, हा भाग वेगळा. पण कृपा करून या प्रकरणावर बोलण्याचा तुला काहीही अधिकार नाही. कारण तुझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. संबंध आहे तर काय संबंध आहे, ते सांग. असं काही नसेल तर त्या निष्पाप महिला पब्लिसिटीसाठी खोटं बोलत आहेत, असं बरळू नकोस. काहीही माहित नसताना ’, अशी शर्लिन म्हणाली.
हे असे लोक कुठून येतात, माहित नाही. राज कुंद्रानं मला का बोलवलं नाही? असा प्रश्न राखी विचारते. अरे, नशीब समज तुला त्यानं बोलवलं नाही. या स्कँडलमध्ये तू फसली नाहीस, यासाठी देवाचे आभार मान, असंही शर्लिन म्हणाली.
राखी सावंत गेल्या अनेक दिवसांपासून राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणात बयानबाजी करताना दिसतेय. 

काय म्हणाली होती राखी?
अभिनेत्री राखी सावंतने राज कुंद्रा प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली होती. ‘राज कुंद्रा अतिशय मेहनती आहे. शिल्पा शेट्टीने अतिशय मेहनत करून हे यश मिळवलं आहे. माझं या दाम्पत्याला संपूर्ण समर्थन आहे.  असं काही नाही, काही लोक राज कुंद्रा आणि दिग्गज शिल्पा शेट्टींकडून पैसे हडप करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मी तुझ्यावर प्रेम करते शिल्पा. मी त्यांच्यावर मनापासून प्रेम करते. मला आठवते शिल्पा शेट्टी यांनी खूप कष्ट केले. त्यांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. त्याचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे. राज कुंद्राने असं काही केलं असतं यावर माझा विश्वास नाही. तो एक भलामाणूसआहे,’असं राखी म्हणाली होती.
 

Web Title: sherlyn chopra slams rakhi sawant for taking raj kundra side in pornography-case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.