‘नाकेबंदी’ करणा-या शर्मनला पाहून कुणाची उडाली भंबेरी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2016 12:54 IST2016-10-22T12:54:58+5:302016-10-22T12:54:58+5:30
शर्मन जोशी सध्या विशाल पांड्या यांच्या ‘वजह तुम हो’ या आगामी क्राईम-थ्रीलर चित्रपटात बिझी आहे. शर्मन या चित्रपटात पोलिस ...

‘नाकेबंदी’ करणा-या शर्मनला पाहून कुणाची उडाली भंबेरी?
श ्मन जोशी सध्या विशाल पांड्या यांच्या ‘वजह तुम हो’ या आगामी क्राईम-थ्रीलर चित्रपटात बिझी आहे. शर्मन या चित्रपटात पोलिस अधिका-याची भूमिका साकारताना दिसणार आहे. अलीकडे मुंबईच्या लोखंडवाला भागात या चित्रपटाचे शूटींग पार पडले. यावेळी शर्मनचा जिवंत अभिनय पाहून, काही तरूण चांगलेच चाट पडलेत. खुद्द शर्मननेच हा किस्सा सांगितला. त्याचे झाले असे की, लोखंडवाला भागात भरदुपारी नाकाबंदीच्या दृश्याचे शूटींग सुरु होते. शर्मन व त्याचा एक सहकारी असे दोघे पोलिस अधिकाºयाच्या पोशाखात रस्त्यावर नाकाबंदीच्या या सीनसाठी तयार होते. याचदरम्यान तीन तरूण एका बाईकवर बसून या रत्यावरून जात असताना पोलिसांच्या वेशातील शर्मन व त्याच्या सहकाºयाला पाहून थबकले. शर्मन पाठमोरा उभा असल्याने त्यांना त्याचा चेहरा दिसला नाही. पण दोन पोलिसांना पाहून त्या तरूणांची चांगलीच भंबेरी उडाली. लायसन्स नाही शिवाय एका बाईकवर ट्रिपल सीट यामुळे तूे तिघेही गयावया करू लागले. माझ्या सहका-यानेही त्या तिघांची चांगलीच खेचली.मग काय, त्या तिघांनी त्या लाच देऊ केली. त्यांचे असे सगळे बोलणे शर्मन ऐकत होताच. अखेर शर्मन अचानक त्या तिघांकडे वळला. मग काय, शर्मनला पाहून येथे शूटींग सुरु आहे, हे कळायला त्या तरूणांना वेळ लागला नाही. यानंतर सगळेच हसत सुटलेत. शर्मनने त्या मुलांशी बºयाच गप्पा मारल्या आणि पुढच्या प्रवासासाठी त्यांना शुभेच्छाही दिल्यात. अर्थात तुम्ही ट्रिपल सीट आहात. आत्ता सुटलात. समोर खरे खुरे पोलिस तुमची वाट पाहत असतील, तर ती तुमची जबाबदारी, हे त्यांना सांगायलाही शर्मन विसरला नाही.
‘वजह तुम हो’ या चित्रपटात सना खान, शर्मन जोशी, गुरमीत चौधरी, रजनीश दुग्गल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
‘वजह तुम हो’ या चित्रपटात सना खान, शर्मन जोशी, गुरमीत चौधरी, रजनीश दुग्गल यांच्या प्रमुख भूमिका आहेत.