शक्ती कपूरच्या पत्नीने या चित्रपटात केले होते काम... पहिल्याच चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी झाली होती शक्तीसोबत भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2018 13:17 IST2018-03-24T07:47:03+5:302018-03-24T13:17:03+5:30
शक्ती कपूरने आज बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या कारकिर्दीत तो अनेक वेळा खलनायकाच्या आणि कॉमिक भूमिकेत झळकला ...
.jpg)
शक्ती कपूरच्या पत्नीने या चित्रपटात केले होते काम... पहिल्याच चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी झाली होती शक्तीसोबत भेट
श ्ती कपूरने आज बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या कारकिर्दीत तो अनेक वेळा खलनायकाच्या आणि कॉमिक भूमिकेत झळकला आहे. त्याच्या कॉमिक टायमिंगचे तर नेहमीच कौतुक केले जाते. शक्तीने आज बॉलिवूडमध्ये त्याचे स्थान निर्माण केले आहे. शक्तीच्या पावलावर पाऊल ठेवून त्याची मुलगी श्रद्धाने देखील बॉलिवूडमध्ये प्रवेश केला असून तिला देखील या क्षेत्रात चांगलेच यश मिळत आहे. श्रद्धाने गेल्या काही वर्षांत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आता श्रद्धाचा भाऊ सिद्धांत हा देखील बॉलिवूडमध्ये आपले भाग्य आजमावणार आहे. तुम्हाला माहीत आहे का, शक्तीची पत्नी देखील एक चित्रपट जगताशी संबंधित आहे. तिला देखील अभिनयाची आवड असल्याने बहुधा त्यांची दोन्ही मुले याच क्षेत्राकडे ओढली गेली आहेत.
शक्तीची पत्नी शिवांगी ही प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरेची बहीण आहे. शिवांगीने आपल्या बहिणीप्रमाणेच बॉलिवूडमध्ये काम केले आहे. शिवांगीने किस्मत या चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती आणि रंजीता प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटात शक्ती कपूरनेही काम केले होते. शक्ती आणि शिवांगीची पहिली भेट देखील याच चित्रपटाच्या सेटवर झाली होती. याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्या दोघांची मैत्री झाली आणि त्यानंतर ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. शिवांगीचे वडील पंढरीनाथ कोल्हापुरे आहे तर आईचे नाव अनुपमा कोल्हापुरे आहे. शिवांगीने आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बॉलिवूडमध्ये प्लेबॅक सिंगर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. शिवांगीचे शक्तीसोबत असलेले प्रेमप्रकरण तिच्या घरातल्यांना आवडले नव्हते आणि त्यामुळे त्यांनी त्या दोघांच्या लग्नाला विरोध केला होता. त्यामुळे शक्ती आणि शिवांगीने घरातून पळून जाऊन लग्न केले. त्यावेळी शिवांगी केवळ अठरा वर्षांची होती. शिवांगी लग्नानंतर अभिनय क्षेत्रापासून दूर गेली. शिवांगी ही एक चांगली गायिका देखील आहे. तिने गायनाचे अनेक वर्षं शिक्षण घेतले आहे. शिवांगीची धाकटी बहीण तेजस्वीदेखील अभिनेत्री असून तिने काही मालिकांमध्ये काम केले आहे.
Also Read : श्रद्धा कपूरने घेतला फरहान अख्तरपासून दूर जाण्याचा निर्णय?