शाहरूख करतोय ‘द रिंग’चे शीर्षक गीत शूट..

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2016 11:33 IST2016-09-07T06:03:05+5:302016-09-07T11:33:05+5:30

दिग्दर्शक इम्तियाज अली, शाहरूख खान आणि अनुष्का शर्मा हे त्रिकुट ‘रब ने बना दी जोडी’ पासून हिट ठरली आहे. ...

Shahrukh is the title song of 'The Ring'. | शाहरूख करतोय ‘द रिंग’चे शीर्षक गीत शूट..

शाहरूख करतोय ‘द रिंग’चे शीर्षक गीत शूट..

ग्दर्शक इम्तियाज अली, शाहरूख खान आणि अनुष्का शर्मा हे त्रिकुट ‘रब ने बना दी जोडी’ पासून हिट ठरली आहे. त्यानंतर याच त्रिकुटाचा ‘जब तक है जान’ हा चित्रपटही रसिकांना आवडला. आता पुन्हा ‘द रिंग’च्या निमित्ताने ही टीम पुन्हा एकदा परतली आहे.

चित्रपटाचे शूटींग प्राग येथे सुरू असून सध्या शाहरूख खान चित्रपटाचे शीर्षक गीत शूट करतो आहे. सोशल मीडियावर या शीर्षक गीतातील काही स्टिल्स व्हायरल झाले आहेत.

‘द रिंग’ हा चित्रपट म्हणजे टुरिस्ट गाईड आणि एका गुजराती तरूणींची लव्हस्टोरी आहे. ‘रब ने बना दी जोडी’ आणि ‘जब तक हैं जान’ नंतर हे दोघे पुन्हा या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. 

prague shahrukh khan

Web Title: Shahrukh is the title song of 'The Ring'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.