शाहरुख म्हणतोय मी तिच्यासारखा नाचूच शकत नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2016 17:46 IST2016-05-23T12:16:04+5:302016-05-23T17:46:04+5:30
अभिनेता शाहरुख खान आज बॉलिवुडचा किंग मानला जातो. शाहरुखच्या अभिनयाप्रमाणे त्याच्या नृत्याचेही नेहमीच कौतुक केले जाते. इतका चांगला अभिनेता, ...
.jpg)
शाहरुख म्हणतोय मी तिच्यासारखा नाचूच शकत नाही
अ िनेता शाहरुख खान आज बॉलिवुडचा किंग मानला जातो. शाहरुखच्या अभिनयाप्रमाणे त्याच्या नृत्याचेही नेहमीच कौतुक केले जाते. इतका चांगला अभिनेता, डान्सर असूनही मी तिच्यासारखा नाचू शकत नाही असे म्हणतोय शाहरुख खान. शाहरुख खानच्या एका फॅनने ट्विटरवर एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्या व्हिडिओमध्ये एक साऊथ आफ्रिकीची बाई भन्नाट नाचताना आपल्याला दिसते. या बाईप्रमाणे तूदेखील नाच असे शाहरुखच्या फॅनने त्याला म्हटले होते. पण यावर मला त्या बाईप्रमाणे नक्कीच नाचायला आवडेल. ती बाई पूर्णपणे मग्न होऊन नाचत आहे. पण तिच्याइतका माझ्यात चपळपणा नसल्याने मी तिच्यासारखा नाचू शकत नाही असे किंग खानने म्हटले आहे.