​शाहरूख खानला ‘झिरो’च्या सेटवर आठवला ‘डर’! मग केले असे काही!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2018 10:58 IST2018-03-18T05:28:20+5:302018-03-18T10:58:20+5:30

सन १९९३ मध्ये आलेल्या ‘डर’ हा चित्रपट तुम्हाला आठवत असेलच. या चित्रपटातील एक सीन तर विसरता येणे शक्यचं नाही. ...

Shahrukh recalled 'Zero' on set of 'fear'! Then something like that !! | ​शाहरूख खानला ‘झिरो’च्या सेटवर आठवला ‘डर’! मग केले असे काही!!

​शाहरूख खानला ‘झिरो’च्या सेटवर आठवला ‘डर’! मग केले असे काही!!

१९९३ मध्ये आलेल्या ‘डर’ हा चित्रपट तुम्हाला आठवत असेलच. या चित्रपटातील एक सीन तर विसरता येणे शक्यचं नाही. होय, यात  शाहरूख खान जुही चावलाच्या फोटोपुढे उभे होऊन तिला ‘आय लव्ह यू कि कि कि किरण...’ म्हणतो. हा सीन शाहरूखने पुन्हा एकदा रिक्रिएट केला आहे. होय, ‘झीरो’च्या सेटवर शाहरूखने हा सीन पुन्हा एकदा जिवंत केला. फरक इतकाच की, यावेळी शाहरूख जुही चावलाच्या नाही तर कॅटरिना कैफच्या फोटोपुढे उभा होता.



तूर्तास शाहरूख त्याचा आगामी सिनेमा ‘झिरो’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात शाहरूखशिवाय कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मा लीड रोलमध्ये आहेत. या चित्रपटाच्या सेटवरचा रोज नवीन फोटो समोर येतो आहे. या दरम्यान शाहरूख खानने आपल्या टिष्ट्वटर पेजवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत शाहरूख खान ‘डर’चा आयकॉनिक सीन थोड्या वेगळ्या अंदाजात सादर करताना दिसतोय. यात शाहरूख कॅटरिनाच्या मोठ्या पोस्टरकडे अतिशय प्रेमाने बघतोय. यात त्याच्यात हातात आईस्क्रीमही आहे. हा फोटो पोस्ट करताना शाहरूखने एक सुंदर कॅप्शन दिले आहे. ‘ही कधीच आईस्क्रीम खात नाही नाही. केवळ आपले काम पूर्ण निष्ठेने आणि कष्टाने पूर्ण करते. हिला पाहून ‘डर’ या चित्रपटाची आठवण झाली. आय लव्ह यू क क क कॅटरिना....’, असे त्याने लिहिलेय. यंदा नाताळच्या मुहूर्तावर म्हणजेच २१ डिसेंबरला ‘झिरो’ प्रदर्शित होणार आहे.  या चित्रपटातील  शाहरूखची  व्यक्तीरेखा ‘गेम आॅफ थ्रोन्स’ या इंग्रजी सीरिजमधील टीरिनयल लेनिस्टर या पात्रावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. यात शाहरूख बुटक्या व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. म्हणजेच, ही बुटकी व्यक्ती दुस-या लोकांमध्ये प्रेम वाढवून त्यांच्यातील दुवा ठरेल. ‘गेम आॅफ थ्रोन्स’ प्रेक्षकांच्या आवडीची शृंखला आहे. शाहरूखसाठी गतवर्षी कमालीचे अनलकी ठरले. ​ गतवर्षातील  त्याचा अखेरचा चित्रपट ‘जब हॅरी मेट सेजल’ही बॉक्सआॅफिसवर कुठलीच कमाल दाखवू शकला नाही. 

ALSO READ : ​शाहरूख खान बनणारं ‘ZERO’! नव्या चित्रपटाचा टीजर रिलीज!!


Web Title: Shahrukh recalled 'Zero' on set of 'fear'! Then something like that !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.