शाहरुख खानचा ऑनस्क्रिन मुलगा करणार करण जोहरसोबत ब्रह्मास्त्रमध्ये काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 16:35 IST2017-10-18T11:05:56+5:302017-10-18T16:35:56+5:30
करण जोहरचा आगामी चित्रपट ब्रह्मास्त्रसाठी शाहरुख खानचा मुलगा असिस्टेंट दिग्दर्शकाचे काम करणार आहे. असे आश्चर्यचकित होऊन जाऊ नका होय ...
.jpg)
शाहरुख खानचा ऑनस्क्रिन मुलगा करणार करण जोहरसोबत ब्रह्मास्त्रमध्ये काम
क ण जोहरचा आगामी चित्रपट ब्रह्मास्त्रसाठी शाहरुख खानचा मुलगा असिस्टेंट दिग्दर्शकाचे काम करणार आहे. असे आश्चर्यचकित होऊन जाऊ नका होय शाहरुख खानचा ऑनस्करिन मुलगा करण जोहरसोबत काम करणार आहे.
करण जोहरचा चित्रपट कभी खुशी कभी हम मध्ये शाहरुख आणि काजोलचा ऑनस्क्रिन मुलगा क्रिस रायचंद आता मोठा झाला आहे. त्याचे नाव जिब्रान खान आहे. जिब्रान करण जोहरचा चित्रपट ब्रह्मास्त्रसाठी दिग्दर्शक अयान मुखर्जीसोबत असिस्टेंट दिग्दर्शक म्हणून काम करतो आहे. 22 वर्षीय जिब्रान अनेक वर्ष पडद्यापासून लांब राहिला, मार्शल आर्ट, कथ्थक आणि हॉर्स रायडिंगमध्ये तो एक्सपर्ट आहे. ऐवढचे नाही तर तो प्रसिद्ध डान्स कोरियोग्राफर शामक दावरच्या डान्स अॅकदमीमध्ये डान्स ट्रेनर म्हणून सुद्धा काम करतो.
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाच्या दिवशी करण जोहरने ब्रह्मस्त्र चित्रपटाची घोषणा ट्विटर अकाऊंटवर केली होती. कारण जोहर ने आपल्या ट्विटर अकाऊंटवर हे ही जाहीर केले की 'ब्रह्मस्त्र' चा पहिला भाग १५ ऑगस्ट २०१९ ला रिलीज केला जाईल. आपणास सांगू इच्छितो की फार दिवसापासून आलिया भट्ट आणि रणबीर कपूर एकाच चित्रपटात दिसणार असल्याच्या बातम्या येत होत्या. या चित्रपटासाठी रणबीरने घोडेस्वारी आणि जिम्नॅस्टिकची ट्रेनिंग घ्यायला सुरुवात सुद्धा केली आहे. या चित्रपटाचे नाव आधी 'ड्रॅगन' असे होते. अयान मुखर्जी भरपूर दिवसांपासून या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत होते . ज्यामध्ये एक सुपरहिरो आहे आणि त्याच्याकडे अद्नभुत शक्ति आहे. या कथेला अनुसरून करण जोहरने या चित्रपटाचे नाव 'ब्रह्मस्त्र' असे ठेवले आहे. हा चित्रपट ३ भागात बनणार आहे. ज्याचा पहिला भाग २०१९ मध्ये रिलीज होईल.पहिल्यांदाच आलिया आणि रणबीर एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.
या शिवाय आलिया मेघना गुलजार दिग्दर्शित राजी चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात आलिया एका काश्मीरी मुलीची भूमिका साकारणार आहे. जिचे लग्न एका पाकिस्तानी अधिकाऱ्याशी होते.