शाहरूख खानची ‘ही’ हिरोईन करतेय कमबॅक! म्हणाली, अभिनय माझे शरीर तर डान्स माझा आत्मा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2018 11:52 IST2018-04-10T06:22:33+5:302018-04-10T11:52:33+5:30
बॉलिवूडमध्ये अनेक चेहरे येतात आणि काळासोबत दिसेनासे होतात. पण अभिनय हेच जीवन असणारे काही चेहरे फार काळ या ग्लॅमरच्या ...

शाहरूख खानची ‘ही’ हिरोईन करतेय कमबॅक! म्हणाली, अभिनय माझे शरीर तर डान्स माझा आत्मा!!
ब लिवूडमध्ये अनेक चेहरे येतात आणि काळासोबत दिसेनासे होतात. पण अभिनय हेच जीवन असणारे काही चेहरे फार काळ या ग्लॅमरच्या दुनियेपासून दूर राहू शकत नाही. अभिनेत्री हृषिता भट्ट ही यातलीच एक. २००१ मध्ये ‘अशोका’ या चित्रपटात शाहरूख खानसोबत झळकलेली हृषिता २०१६ मध्ये आलेल्या ‘30 मिनिट’नंतर कधीच बॉलिवूडमध्ये दिसली नाही. गतवर्षी तिच्या लग्नाचीच बातमी आली. युएन डिप्लोमेट आनंद तिवारी याच्यासोबत तिने अगदी गुपचूप लग्नगाठ बांधली. हीच हृषिता लवकरच मोठ्या पडद्यावर परतणार आहे. होय. जोजो डिसूजाच्या ‘इश्क तेरा’ या चित्रपटातून ती कमबॅक करतेय. ‘अक्सर2’फेम मोहित मदान तिच्यासोबत लीड रोलमध्ये आहे. ‘इश्क तेरा’ हा चित्रपट पती-पत्नीच्या आयुष्यावर आधारित चित्रपट आहे.
![]()
या चित्रपटात हृषिता ही मानसिक आजाराने पीडित कल्पना नामक मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. पत्नीवर वेड्यासारखा प्रेम करणारा पती तिला या आजारातून बाहेर काढतो, असे याचे कथानक आहे. येत्या २० एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. हृषिता या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सूक आहे. डान्स माझा आत्मा आहे तर अभिनय माझे शरीर. मी टीव्ही शो, जाहिराती, चित्रपट यात बिझी असले तरी माझे पॅशन डान्स हेच आहे, असे हृषिताने अलीकडे एका मुलाखतीत सांगितले होते.
ALSO READ : SEE PICS : ‘अशोका’ फेम हृषिता भट्ट अडकली लग्नबंधनात!
हृषिताने ‘दिल विल प्यार व्यार’,‘अब तक छप्पन’,‘हासिल’,‘मिस टनकपूर हाजिर हो’,‘पेज३’आदी चित्रपटात काम केले. सन २०१६ मध्ये आलेल्या ‘30 मिनिट’ या चित्रपटातही ती दिसली होती. सन २००१ मध्ये आलेल्या ‘अशोका’या चित्रपटाद्वारे हृषिताने बॉलिवूड डेब्यू केला होता. २००३ मध्ये आलेल्या ‘हासिल’मधील हृषिताच्या भूमिकेचे अनेकांनी कौतुक केले. यानंतर ती अनेक चित्रपटांत दिसली. हिंदीसोबतच बंगाली, तेलगू व मराठी चित्रपटांमध्येही हृषिताने काम केले. खरे तर हृषिताला पायलट बनायचे होते. मात्र सात वर्षांची असताना आईने हृषिताना कथ्थकच्या क्लासमध्ये टाकले. यानंतर १२ व्या वर्गात असताना अचानक रॅम्पवॉक करण्याची संधी हृषिताला मिळाली. एका शोमधील मुलगी अचानक आजारी पडली आणि शिक्षिकेने या मुलीच्या जागेवर हृषिताना पाठवले. विशेष म्हणजे हृषिताने हा शो जिंकला. यानंतर मॉडेलिंग, जाहिराती तिला मिळाल्या. ‘मुव्हर्स अॅण्ड शेखर’ या शोमध्ये हृषिता गेली आणि त्याचदिवशी तिला सात ते आठ चित्रपटांच्या आॅफर्स आल्यात.