धोनीच्या मुलीसोबत जमली शाहरुख खानची गट्टी; पाहा दोघांमधील धमालमस्तीचे फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2018 14:58 IST2018-04-11T09:28:02+5:302018-04-11T14:58:21+5:30

महेंद्रसिंह धोनीच्या मुलीचे आणि शाहरुख खानचे फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये दोघांची गट्टी जमल्याचे दिसून येत आहेत.

Shahrukh Khan's daughter accompanying Dhoni's daughter; See photos of both of them! | धोनीच्या मुलीसोबत जमली शाहरुख खानची गट्टी; पाहा दोघांमधील धमालमस्तीचे फोटो!

धोनीच्या मुलीसोबत जमली शाहरुख खानची गट्टी; पाहा दोघांमधील धमालमस्तीचे फोटो!

लिवूड किंग शाहरुख खान आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याची तीन वर्षांची मुलगी जिवाचे फोटो सध्या इंटरनेटवर वाºयासारखे व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये जिवा स्टेडियमध्येच किंग खानसोबत चांगलीच मस्ती करताना दिसत आहे. चेन्नई येथे मंगळवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स असा सामना रंगला होता. चेन्नई सुपरकिंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षी मुलगी जिवाला घेऊन स्टेडियममध्ये पोहोचली होती. यावेळी तिची भेट सुपरस्टार शाहरुख खानशी झाली. यावेळी शाहरुखची गट्टी धोनीच्या मुलीसोबत झाल्याचे बघावयास मिळाले. जिवालाही शाहरुखची कंपनी चांगली वाटली. ती त्याच्यासोबत खेळताना दिसली. 
 

पापा धोनीच्या टीमला सपोर्ट करण्यासाठीच साक्षी आणि जिवा मैदानावर पोहोचले होते. विशेष म्हणजे, हा सामना ज्या पद्धतीने रंगला तशीच काहीशी गट्टी जिवा आणि शाहरुखमध्ये रंगली होती. मैदानाबरोबरच स्टेडिअममध्ये या दोघांची मस्ती चर्चेत राहिली. अनेकांनी त्यांचे फोटो कॅमेºयात कैद केले. दरम्यान, हा सामना महेंद्रसिंह धोनीच्या संघाने जिंकला. परंतु जिवाचे मन जिंकण्यात शाहरुख यशस्वी झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, जिवा आणि शाहरुखच्या या धमालमस्तीत दिनेश कार्तिकची आईही सहभागी झाली होती. 
 

दरम्यान, कोलकाता नाइट रायडर्सचा धडाकेबाज फलंदाज आंद्रे रसेलने जबरदस्त फलंंदाजी करताना केवळ ३६ चेंतून ८८ रन तडकावले. त्याने चेन्नई सुपरकिंग्सच्या गोलंंदाजांची येथेच्छ धुलाई केली. मैदानाच्या चहुबाजूने षटकारांची बरसात करताना त्याने चेन्नई सुपरकिंग्सच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले होते. परंतु अशातही हा सामना कोलकाता नाइट रायडर्सला जिंकता आला नाही. 
 

Web Title: Shahrukh Khan's daughter accompanying Dhoni's daughter; See photos of both of them!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.