या दिग्दर्शकाच्या हातून शाहरुख खानने खल्ला होता मार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 16:31 IST2017-10-13T11:00:26+5:302017-10-13T16:31:12+5:30
बॉलिवूड सुपरस्टार अभिनेता शाहरुख खानने एक खळबळजन खुलासा केला आहे.शाहरुखने सांगितले शूटिंगच्या दरम्यान एक दिग्दर्शकाच्या हातून त्यांने बेदम मार ...

या दिग्दर्शकाच्या हातून शाहरुख खानने खल्ला होता मार
ब लिवूड सुपरस्टार अभिनेता शाहरुख खानने एक खळबळजन खुलासा केला आहे.शाहरुखने सांगितले शूटिंगच्या दरम्यान एक दिग्दर्शकाच्या हातून त्यांने बेदम मार खल्ला होता. होय तुम्ही बरोबर वाचलात कै. दिग्दर्शक कुंदन शाह यांच्या प्रार्थना सभेत शाहरुखने हा खुलासा केला आहे. कुंदन शाह यांच्या आठवणींना ताज्या करताना शाहरुख म्हणाला की, कुंदन शाह नेहमीच माझ्यातले बेस्ट काढून घ्यायचा प्रयत्न करायचे. कधी कधी मी त्यांचा ओरडा देखील खायचो. ऐवढेच नाही तर मी त्यांचा मार देखील खल्ला होता. जोपर्यंत त्यांना शॉर्ट आवडायचा नाही तोपर्यंत 100 वेळा ते रिटेक द्यायला लावायचे. कुंदन शाह यांची स्तुती करताना शाहरुख म्हणाला, ''मी ज्यावेळी 25 वर्षांपूर्वी मुंबईत आलो होतो, त्यावेळी त्यांनीच मला त्यांच्या घरात ठेवून घेतले होते आणि मला जेवायला द्यायचे. मला घरासारखे प्रेम त्यांनी दिले.'' पुढे शाहरुख म्हणाला, माझ्या घरात त्यांच्या चित्रपटाचे अनेक पोस्टर लावले आहेत. त्यांचा चित्रपट जाने भी दो यारों च्या पोस्टरवर मला त्यांचा ऑटोग्राफ घ्यायचा होता. मी अनेक वेळा त्यांना हे सांगितले देखील होते मात्र ते टाळाटाळ करायचे. माझे हे स्वप्न-स्वप्नच राहुन गेले.
ALSO READ : सुपरस्टार झाल्यानंतरही घर चालवण्यासाठी शाहरुख खान करायचे 'हे' काम
शाहरुख खानच्या कभी हा कभी ना चित्रपटाचे दिग्दर्शन कुंदन शाह यांनी केले होते. कुंदन शाह यांनी बॉलिवूडमधल्या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. जाने भी दो यारों या त्याच्या चित्रपटासाठी त्यांनी नॅशनल अॅवॉर्डसुद्धा मिळाला होता. याशिवाय नुक्कड आणि वागले की दुनिया यासारख्या मालिकादेखील त्यांनी तयार केल्या होत्या. 7 ऑक्टोबरला ह्रदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. कुंदन शाह यांच्यासाठी ठेवण्यात आलेल्या या शोकसभेत शाहरुख खानसह अजीज मिर्झा. डेविड धवन यांनी सुद्धा श्रद्धांजली वाहिली.
लवकरच शाहरुख खान छोट्या पडद्यावर एंट्री घेणार आहे. टेड टॉक्स इंडिया नई सोच’ या कार्यक्रमाद्वारे बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.