Shahrukh Khan :श्रीनगर एअरपोर्टवर चाहत्यांच्या गऱ्हाड्यात अडकला पठाण, शाहरुख खानची झाली अशी अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 05:01 PM2023-04-29T17:01:59+5:302023-04-29T17:33:57+5:30

चाहते किंग खानसोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, यादरम्यान शाहरुख खान खूपच अस्वस्थ दिसत असून गर्दीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे.

Shahrukh khan surrounded by crowd while returning from srinagar video gone viral | Shahrukh Khan :श्रीनगर एअरपोर्टवर चाहत्यांच्या गऱ्हाड्यात अडकला पठाण, शाहरुख खानची झाली अशी अवस्था

Shahrukh Khan :श्रीनगर एअरपोर्टवर चाहत्यांच्या गऱ्हाड्यात अडकला पठाण, शाहरुख खानची झाली अशी अवस्था

googlenewsNext

Shahrukh Khan Viral Video: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) गेल्या काही दिवसांपासून त्याचा आगामी  'डंकी' (Dunki)च्या शूटसाठी काश्मीरमध्ये होता. काश्मीरमधला त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला होता. काश्मीरमधलं शूटिंग संपवून परतत असताना शाहरुख खानला त्याच्या चाहत्यांनी एअरपोर्टवर घेरलं. श्रीनगरच्या एअरपोर्टवरचा शाहरुख खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो. किंगखानची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते आतुरत होते. 

चाहत्यांनी शाहरुखला घेरले 
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये शाहरुख खान काश्मीरमधील श्रीनगर विमानतळावर दिसत आहे. चाहते त्यांच्या आवडत्या स्टारसोबत क्लिक केलेले फोटो काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, यादरम्यान शाहरुख खान खूपच अस्वस्थ दिसत असून गर्दीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. यादरम्यान त्याचे अंगरक्षकही लोकांना त्याच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतात.


मुंबईतील कलिना विमानतळावरून किंग खानचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये तो श्रीनगर एअरपोर्टवर दिसलेल्या आउटफिटमध्ये दिसत आहे. किंग खानने पांढरा टी-शर्ट काळी पँट आणि त्यावर जॅकेट घातले आहे. यादरम्यान तो पापाराझींसाठी पोज देणे टाळताना दिसला.

शाहरुख खान  2023च्या सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. आधी पठाण सिनेमाची रेकॉर्डब्रेक कमाई आता तो आगामी सिनेमाच्या शूट मध्ये तो व्यस्त आहे. चार वर्षांनंतर किंग खान पुन्हा अॅक्टिव्ह झाला आहे. 'डंकी' या चित्रपटातून शाहरुख पहिल्यांदाच राजकुमार हिरानी यांच्याबरोबर काम करत आहे. सिनेमात तापसी पन्नू, विक्की कौशल, बोमन ईरानी आणि सतीश शाह यांचीही मुख्य भूमिका आहे.
 

Web Title: Shahrukh khan surrounded by crowd while returning from srinagar video gone viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.