​आलिया भट्टने चलाखीने टाळला शाहरूख खानचा चित्रपट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2017 15:53 IST2017-05-19T10:23:01+5:302017-05-19T15:53:01+5:30

आनंद एल राय यांच्या चित्रपटाची सध्या बरीच चर्चा आहे. शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित ...

Shahrukh Khan film avoided by Abhijit Bhatt | ​आलिया भट्टने चलाखीने टाळला शाहरूख खानचा चित्रपट!

​आलिया भट्टने चलाखीने टाळला शाहरूख खानचा चित्रपट!

ंद एल राय यांच्या चित्रपटाची सध्या बरीच चर्चा आहे. शाहरूख खानची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होईल, असे सांगितले जात आहे. चित्रपटाची तयारीही सुरु झाली आहे. पण हिरोईनचे म्हणाल तर अद्याप तिचा पत्ता नाही. होय, या चित्रपटासाठी अद्याप हिरोईन फायनल झालेली नाही. चर्चा खरी मानाल तर, आधी या चित्रपटासाठी कॅटरिना कैफ आणि दीपिका पादुकोण या दोघींची नावे चर्चेत होती. मात्र दीपिकाने हा चित्रपट बिझी असल्यामुळे नाकारला. कॅटरिनाने हा चित्रपट नाकारला नाही, तसा स्वीकारलाही नाही.(म्हणजे अद्यापही ती या चित्रपटात दिसण्याची शक्यता मावळलेली नाही.) यादरम्यान या चित्रपटासाठी आलिया भट्टचे नावही चर्चेत आले. मात्र सूत्रांचे मानाल तर आलियाने अतिशय चतुराईने या चित्रपटास नकार दिला आहे. यापूर्वी ‘डिअर जिंदगी’ या चित्रपटात शाहरूख व आलिया सोबत दिसले होते. शाहरूखसोबत आलियाचे एक वेगळे बॉन्डिंग आहे. त्यामुळे आलियाला शाहरूखला नाराज करायचे नव्हते.

त्यामुळे तिने करण जोहरचा मदत घेतली. ती करणने सुचवलेल्या आयडियानुसार, तिच्या येणाºया चित्रपटाच्या सगळ्या शूटींग डेट्स घेऊन शाहरूखकडे पोहोचली. शाहरूखला तिने सगळे शूटींग शेड्यूल समजावून सांगितले. मी मोकळी होईपर्यंत तुम्ही थांबायला तयार असाल तर माझा या चित्रपटाला होकार आहे. अन्यथा नाही, असे तिने शाहरूखला स्पष्टपणे सांगितले. मग काय, करणची आयडिया काम करून गेली. शाहरूखने आलियाची अगतिकता समजून घेतली आणि नाराजीही टळली. त्यामुळे तूर्तास आनंद एल रायच्या चित्रपटासाठी पुन्हा एकदा हिरोईनचा शोध सुरु झाला आहे. तो कुठे येऊन थांबतो, ते आपण बघूच!!

Web Title: Shahrukh Khan film avoided by Abhijit Bhatt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.