शाहरुखच्या 'डंकी' चा टीझर रिलीज, मराठी अभिनेत्रीच्या कॉमेडी सीनने वेधलं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 14:08 IST2023-11-02T14:06:52+5:302023-11-02T14:08:02+5:30
शाहरुख खानच्या 'डंकी' सिनेमात कोणत्या मराठी अभिनेत्रीची भूमिका?

शाहरुखच्या 'डंकी' चा टीझर रिलीज, मराठी अभिनेत्रीच्या कॉमेडी सीनने वेधलं लक्ष
शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) बहुप्रतिक्षित चित्रपट 'डंकी' (Dunki) चा पहिला टीझर नुकताच रिलीज झाला. आज किंग खानने त्याच्या वाढदिवशीच चाहत्यांना सरप्राईज दिलं. तापसी पन्नू, विकी कौशल यांचीही सिनेमात महत्वाची् भूमिका आहेत. टीझरमध्ये एक मराठी अभिनेत्री झळकल्याने सर्वांचंच लक्ष वेधलं गेलं. कोण आहे ती अभिनेत्री?
शाहरुख खानच्या 'डंकी' सिनेमाचा पहिलाच टीझर नुकताच रिलीज झालाय. शाहरुख यामध्ये हार्डी ही भूमिका साकारत आहे. चार मित्रांना लंडनला पोहोचवण्यासाठी शाहरुख खानची धडपड सुरु असते. यातील एका मित्राच्या आजीची भूमिका मराठी अभिनेत्री ज्योती सुभाष (Jyoti Subhash) यांनी केली आहे. टीझरमध्ये दाखवलं आहे की, बग्गु नावाच्या मित्राची आई त्याला म्हणते तू जर परत लंडनला जायचा विचारही केला तर बघ. त्याची आई त्याला आजीची शप्पथ घ्यायला सांगते. ही आजी म्हणजेच ज्योती सुभाष. 'अरे सतत माझीच काय शप्पथ घेता?' असा त्यांचा डायलॉग आहे.
ज्योती सुभाष या छोट्याशा सीनमधूनही भाव खाऊन गेल्या आहेत. हा कॉमेडी सीन टीझरमध्ये खूपच पसंत केला जातोय. काही मिनिटातच टीझरला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. २२ डिसेंबरला 'डंकी' रिलीज होतोय. राजकुमार हिरानींच्या या सिनेमात शाहरुख पहिल्यांदाच झळकणार आहे.