​शाहरूख खान व संजय लीला भन्साळी १६ वर्षांनंतर करणार ‘गुस्ताखियां’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2016 15:03 IST2016-12-23T15:03:16+5:302016-12-23T15:03:16+5:30

सध्या शाहरूख खान सगळ्यांसोबतचे वाद संपवण्याच्या प्रयत्नांत आहे, असेच दिसतेय. आधी सलमान खानसोबत त्याचे पॅचअप झाले. आता दिग्दर्शक संजय ...

Shahrukh Khan and Sanjay Leela Bhansali will be 'bluffing' after 16 years | ​शाहरूख खान व संजय लीला भन्साळी १६ वर्षांनंतर करणार ‘गुस्ताखियां’

​शाहरूख खान व संजय लीला भन्साळी १६ वर्षांनंतर करणार ‘गुस्ताखियां’

्या शाहरूख खान सगळ्यांसोबतचे वाद संपवण्याच्या प्रयत्नांत आहे, असेच दिसतेय. आधी सलमान खानसोबत त्याचे पॅचअप झाले. आता दिग्दर्शक संजय लीला भन्साळींशीही जुळवून घ्यायचे असे शाहरूखने ठरवलेले दिसतेय. त्याचाच परिपाक म्हणजे, शाहरूख व संजय लीला भन्साळी तब्बल १६ वर्षांनंतर एकत्र काम करणार आहेत.

होय, सन २०१८ मध्ये म्हणजे ‘पद्मावती’नंतर भन्साळी एक बायोपिक बनवणार आहेत. या बायोपिकसाठी भन्साळींनी शाहरूखची निवड केली आहे. स्वर्गीय कवी आणि लेखक साहिर लुधियानवी यांच्या आयुष्यावर बेतलेल्या या बायोपिकमध्ये शाहरूख साहिर यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. खरे तर आधी या भूमिकेसाठी इरफान खान आणि फवाद खान या दोघांची नावे चर्चेत होती. मात्र या दोघांना बाद करत भन्साळींनी शाहरूखची निवड केलीय. या बायोपिकचे नाव ‘गुस्ताखियां’ असू शकते. अद्याप शाहरूखने हा चित्रपट साईन केलेला नाही. पण सूत्रांचे मानाल तर शाहरूखने याची जोरात तयारी सुरु केलीयं. साहिर यांच्या कविता, गझला ऐकण्यात शाहरूख सध्या बिझी आहे.या चित्रपटात  अमृता प्रीतम यांच्या भूमिकेसाठी प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोण यांची नावे चर्चेत होती. सूत्रांच्या मते, ‘गुस्ताखियां’मध्ये या दोघींपैकी प्रियांकाची वर्णी लागू शकते.

गतवर्षी भन्साळींचा ‘बाजीराव मस्तानी’ आणि शाहरूखचा ‘दिलवाले’ हे दोन सिनेमे एकाच दिवशी बॉक्सआॅफिसवर धडकले होते. या बॉक्स आॅफिस ‘क्लॅश’ने शाहरूख व भन्साळी यांच्यात ‘क्लॅश’ झाला होता. पण कदाचित आता हे सगळे मतभेद संपलेत.


साहिर लुधियानवी -अमृता प्रीतम

साहिर लुधियानवी यांचे खरे नाव अब्दुल हयी होते. त्यांचे अनेक लव्ह अफेअर्स झालेत. मात्र शेवटपर्यंत ते अविवाहित राहिले. लेखिका व कवयित्री अमृता प्रीतम आणि गायिका तसेच अभिनेत्री सुधा मल्होत्रा यांच्यासोबतचे साहिर यांचे रिलेशनशिप बरेच चर्चेत राहिले. १९६३ मध्ये आलेल्या ‘ताजमहल’ या चित्रपटातील ‘जो वादा किया वो, निभाना पडेंगा’ या गाण्याचे बोल साहिर यांनी लिहिले होते. यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने गौरविण्यात आले होते. यानंतर साहिर यांनी बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांसाठी गाणी लिहिली.

Web Title: Shahrukh Khan and Sanjay Leela Bhansali will be 'bluffing' after 16 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.