​शाहरूखने साईन केला हॉलिवूड सिनेमा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2016 20:18 IST2016-04-08T03:17:27+5:302016-04-07T20:18:53+5:30

बॉलिवूड मेगास्टार शाहरूख खानचे चाहते केवळ देशातच नाहीत तर जगात सर्वत्र त्याचे चाहते आहेत. अलीकडे शाहरूख त्याच्या खूप मोठ्या ...

Shahrukh has a Hollywood cinema? | ​शाहरूखने साईन केला हॉलिवूड सिनेमा?

​शाहरूखने साईन केला हॉलिवूड सिनेमा?

लिवूड मेगास्टार शाहरूख खानचे चाहते केवळ देशातच नाहीत तर जगात सर्वत्र त्याचे चाहते आहेत. अलीकडे शाहरूख त्याच्या खूप मोठ्या चाहतीला भेटला. ही चाहती कोण माहिती आहे, हॉलिवूड चित्रपट ‘मॅट्रिक्स’ची डायरेक्टर लाना वाचोवस्की. लाना तिचा शो ‘सेन्स8’च्या दुसºया सीझनच्या शुटींगसाठी मुंबईत आली होती. शूटींग संपवून मुंबई सोडण्यापूर्वी लानाने शाहरूखला भेटायची इच्छा व्यक्त केली. लाना ही शाहरूखची मोठी फॅन आहे. शाहरूखचे जवळजवळ सर्वच चित्रपट तिने पाहिले आहे. इतक्या मोठ्या चाहतीला भेटण्यास शाहरूख नकार बरे कसा देणार? त्याने वेळ दिली आणि लाना व तिची बहीणी लीली दोघीही शाहरूखला भेटल्या. या दोघींसोबतचा एक फोटो किंगखानने सोशल मीडियावर शेअर केला. हा फोटो तर आपण पाहूच. पण त्याआधी पुढे वाचा. शाहरूखने लानाचा चित्रपट साईन केला, अशी चर्चा यानंतर रंगली. आता ही चर्चा खरी की खोटी, हे अद्याप कळले नाही. पण तसे झालेच तर आनंद होईल...होय ना!!

Web Title: Shahrukh has a Hollywood cinema?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.