​शाहरूख , दारासिंह यांच्यानंतर या सेलिब्रिटींवर येणार पुस्तक़...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2016 12:08 IST2016-12-14T12:05:25+5:302016-12-14T12:08:44+5:30

अगदी काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान याच्यावरील ‘SRK-25 Years of A Life’ नामक पुस्तक प्रकाशित झाले. चित्रपट निर्माते ...

Shahrukh, Dara Singh will be visiting the celebrities ... | ​शाहरूख , दारासिंह यांच्यानंतर या सेलिब्रिटींवर येणार पुस्तक़...

​शाहरूख , दारासिंह यांच्यानंतर या सेलिब्रिटींवर येणार पुस्तक़...

दी काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचा किंगखान शाहरूख खान याच्यावरील ‘SRK-25 Years of A Life’ नामक पुस्तक प्रकाशित झाले. चित्रपट निर्माते आणि लेखक समर खान यांच्या लेखनीतून साकारलेल्या या पुस्तकात शाहरूखबद्दल वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी सांगितलेले किस्से आणि अनुभव आहेत. १८४ पानांच्या या पुस्तकाला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळत असतानाच ‘रूस्तम-ए-हिंद’ आणि अभिनेते दारा सिंह यांचे जीवनचरित्र प्रकाशित झाले आहे.



अगदी काल-परवा अभिनेता अक्षय कुमार याच्या हस्ते दारा सिंह यांचा जीवनप्रवास मांडणाºया ‘दीदारा’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले.  सीमा सोनिक अलिमचंद लिखीत ‘दीदारा’ यांनी हे पुस्तक लिहिले आहे. पंजाबातील धरमूचक हे दारासिंह यांचे मूळ गाव. सीमा सोनिक अलीमचंद पंजाबातील याच गावाशेजारच्या एका गावात गेल्या होत्या. यावेळी गावातील प्रत्येकजण त्यांच्याजवळ दारासिंहबद्दल भरभरून बोलला आणि याच क्षणाला सीमा यांच्या डोक्यात दारा सिंह यांचे जीवनचरित्र लिहिण्याचा विचार चमकला. त्यानुसार हे पुस्तक प्रत्यक्षात साकारलेही. 



येत्या काही दिवसांत बॉलिवूडमधील आणखी अशाच काही सेलिब्रिटींचे आयुष्य पुस्तकरूपात उलगडणार आहे. त्यावर एक नजर....

 नवाजुद्दीन सिद्दीकी 



अपार संघर्षानंतर नवाजुद्दीन सिद्दीकीला बॉलिवूडमध्ये यशाचा मार्ग गवसलाय. त्याचा हा बॉलिवूडमधील संघर्ष लवकरच पुस्तकरूपात येत आहे. सन फ्रान्सिस्कोमधील पत्रकार रितुपर्णा चटॅर्जी नवाजुद्दीनच्या आठवणींना पुस्तक रूपात घेऊन येत आहेत. त्या या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत. २०१२मध्ये रीमा कागती यांचा ‘तलाश’ हा सिनेमा आला. मॅटर्निटी लिव्हवर असलेल्या रितुपर्णा यांनी हा सिनेमा बघितला आणि  या सिनेमात नवाजुद्दीनने साकारलेल्या तहमूर या पात्राच्या जणू त्या प्रेमातच पडल्या. यानंतर कित्येक महिने तहमूर हे पात्र रितुपर्णा यांच्या डोक्यात भिनत गेले. येथूनच नवाजबद्दल जाणून घेण्याची उत्सूकता रितुपर्णा यांना लागली. यानंतर काही वर्षांनी रितुपर्णा भारतात आल्या. तेव्हा सर्वात आधी त्या नवाजुद्दीनला जाऊन भेटल्या. या भेटीतून नवाजच्या संघर्षाला पुस्तक रूपात आणण्याची कल्पना प्रत्यक्षात साकारली.

 नवाज एक अभिनेता असला तरी एक संवेदनशील व्यक्ति आहे. त्याचा संघर्ष प्रेरणादायी आहे, तेवढाच संवेदनशील डोळ्यांत अश्रू आणणारा आहे. त्याचे असेच काही अनुभव या पुस्तकात वाचायला मिळणार आहेत.
- रितुपर्णा चॅटर्जी


 मनोज कुमार 



सिनेपत्रकार रोशमिला भट्टाचार्य लिखित मनोज कुमार यांचे जीवनचरित्रही आपल्याला लवकरच वाचायला मिळणार आहे. बॉलिवूडचे ‘भारत कुमार’ ओळखले जातात ते त्यांच्या देशभक्तिपर चित्रपटांसाठी. पाच चित्रपटांत मनोज कुमार भारत कुमार या नावाने झळकले आणि पुढे भारत कुमार हेच त्यांचे नाव रूढ झाले. फाळणीनंतर वेळेस मनोज कुमार यांचे कुटुंब भारतात आले. यादरम्यान मनोज कुमारांचे अनुभव, ‘शहीद’ चित्रपट साकारताना शहीद भगतसिंह यांच्या आईशी निर्माण झालेली त्यांची जवळीक हे सगळे या जीवनचरित्रात आपणास वाचायला मिळणार आहे. 

मनोज कुमार यांना पडद्यावर रोमॅन्टिक हिरो साकारण्यापेक्षा देशभक्त साकारणे आवडे. देशभक्तीने ओतप्रोत भरलेल्या या अभिनेत्याच्या आयुष्यातील अनेक अनुभव तुम्हाला पुस्तकात वाचायला मिळतील.
-रोशमिला भट्टाचार्य

 ऋषी कपूर 



एकेकाळी आपल्या रोमॅन्टि भूमिकांनी बॉलिवूड गाजवणारे आणि अद्यापही बॉलिवूडमध्ये सक्रिय असलेले अभिनेत ऋषी कपूर त्यांचे आत्मचरित्र घेऊन येत आहेत. सिने पत्रकार मीना अय्यर या आत्मचरित्राच्या सहलेखिका आहेत. या आत्मचरित्रात ऋषी कपूर यांच्या स्वभावाचे अनेक कंगोरे वाचकांना जाणता येणार आहे. आजोबा पृथ्वीराज कपूर, वडील राज कपूर यांच्यापासून तर स्वत:पर्यंत आणि यानंतर मुलगा रणबीर कपूर याच्यापर्यंतचा प्रवास या आत्मचरित्रात मांडलेला दिसणार आहे.

वडिल राजकपूर आणि आई कृष्णा यांचे ऋषी कपूर यांच्या आयुष्यातील स्थान खूप मोठे होते. या आत्मचरित्रात यावर एक स्वतंत्र प्रकरण आहे. ऋषी कपूर यांच्याबद्दल लोकांना फार कमी माहिती आहे. असेच मी म्हणेल. लोकांना माहित नसलेले ऋषी कपूर या आत्मचरित्रात दिसणार आहेत.
-मीना अय्यर


कबीर बेदी



येत्या काळात अभिनेता कबीर बेदी यांचे जीवनचरित्रही आपल्याला वाचायला मिळणार आहे.  पत्रकार पुनम सक्सेना या कबीर बेदींचा जीवनप्रवास पुस्तकरूपात मांडणार आहेत. या पुस्तकाचे काम सध्या सुरु आहे. कबीर बेदींचा बॉलिवूड ते हॉलिवूड प्रवास यात असणार आहे.

या पुस्तकात कबीर बेदींचे बालपण, बॉलिवूडमधील त्यांचा प्रवास आणि त्यांचे वैयक्तिक आयुष्य मांडले जाणार आहे.
- पुनम सक्सेना

Web Title: Shahrukh, Dara Singh will be visiting the celebrities ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.